लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला
लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला ।बहु प्रेमाने पंचारति ही करित असो बा तुज विमला ॥ ध्रु० ॥
दृढ भक्ती पाहुनिया दिधले ध्रुवपद जैसे ध्रुवबाला ।
अर्जुनरथि सारथ्य हि करुनि अवगाहीले अश्वाला ॥
ऐकुनि ऐशा तव औदार्या आठवितो तव पदकमला ।
दृढ भक्तीने रुक्मिणिसुत हा, देई दर्शना तव विमला ॥ १ ॥