Loading ...

चांभारगड किल्ला

चांभारगड किल्ला - [Chambhargad Fort] १२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील विस्तिर्ण डोंगररांगेत आहे आणि ट्रेकींगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे.

चांभारगड किल्ला - Chambhargad Fort

चांभारगड किल्ला रायगड जिल्ह्यातील विस्तिर्ण डोंगररांगेत आहे आणि ट्रेकींगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे

चांभारगड किल्ला - [Chambhargad Fort] १२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील विस्तिर्ण डोंगररांगेत आहे आणि ट्रेकींगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे. रायगडाच्या आजूबाजूला असणार्‍या डोंगररांगावर अनेक किल्ले आहेत. यांत प्रामुख्याने लिंगाणा, काळदुर्ग, सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो. यांचा उपयोग केवळ घाटमाथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहेळणीसाठी होत असावा. चांभारगड हा गडापासून हाकेच्या अंतरावर आहे.

चांभारगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठारच आहे. पठारावर थोडेफार घरांचे अवशेष आहेत तर पठाराच्या खालच्या डोंगराच्या पट्टीवर पाण्याची एक दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या बांधणीवरुन हा गड फार पुरातन असावा असा अंदाज बांधता येतो. याखेरीज गडावर पाहण्याजोगे काहीच नाही. अर्ध्या तासात संपूर्ण गडफेरी आटपते.

चांभारगड गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्यासाठी महाड गाठावे. महाडा-पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखेड गावात पोहोवावे. महाड एस.टी. स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात. या खिंडीतुन पाऊण तासाच्या चालीनंतर आपण माथ्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे. नंतर वर जाणाई वाट पकडून १५ मिनिटांत गडमाथा गाठता येतो.


किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. किल्ल्यावर हॉटेल्स, खानावळ नसल्याने जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. तसेच किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने पाण्याचीही सोय स्वतःलाच करावी लागते.किल्ल्यावर जाण्यासाठी महाड गावातून एक तास लागतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची