नारायण खगवाहन - विष्णूची आरती

नारायण खगवाहन, विष्णूची आरती - [Narayan Khagvahan, Vishnuchi Aarti] नारायण खगवाहन चतुराननताता, स्मर‍अरितापविमोचन पयनिधिजामाता.

नारायण खगवाहन चतुराननताता

नारायण खगवाहन चतुराननताता ।
स्मर‍अरितापविमोचन पयनिधिजामाता ॥
वैकुंठाधिपते तव महिमा मुखि गाता ।
सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय लक्ष्मीकांता ।
मंगल आरति करितो भावे सुजनहिता ॥ ध्रु० ॥

सदैव लालन पालन विश्वाचे करिसी ।
दासास्तव तू नाना अवतार धरिसी ॥
दुष्टा मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी ।
निशिदिनी षण्मुखताताते हृदयी स्मरसी ॥ जय० ॥ २ ॥

चपला सहस्त्र जयाच्या जडल्या वसनासी ।
कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥
कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी ।
ज्याते हृदयी ध्याता भवभय अघ नाशी ॥ जय० ॥ ३ ॥

तारी वारी संकट मारी षड्रिपुला ।
स्मरती त्याते देइ संपत्ती विपुला ॥
तापत्रय जाळितसे निशिदिनि मम वपुला ।
दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥ ४ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.