बिरवाडी किल्ला

बिरवाडी किल्ला - [Birwadi Fort] १२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
बिरवाडी किल्ला - Birwadi Fort

रायगड जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

बिरवाडी किल्ला - [Birwadi Fort] १२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तलगड, मानगड कुर्डुगड, बीरवाडी असे अनेक छोटेछोटे किल्ले आहेत. इतिहासात फारसा कुठे उल्लेख नसलेला बीरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ कि.मी. अंतरावर आहे. स्वतःचे वाहन असलेतर १ ते २ तासात किल्ला सहज पाहून होते.

बिरवाडी किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० बांधलेल्या पायऱ्या आहेत. सध्या देवळाचा जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्यामागील बाजूस शिवरायांचा ६ फूटी पुतळा उभा आहे. येथून वर चढल्यावर एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते. ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळून गडावर पोहचते. वाटेत एका ठिकाणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ठ्य असे की किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे प्रवेशद्वार आहे. आजही हे बऱ्यापैकी शाबूत आहे. येथून थोडेवर गेल्यावर आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अनेक अवशेष आहेत. किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी आढळतात. गडमाथा फारच निमुळता असल्यामुळे तो फिरण्यास अर्धातास पुरतो.

बिरवाडी गडावर जाण्याच्या वाटा


किल्ल्यावर जाणाचा एकच मार्ग आहे. तो बिरवाडि गावातून जातो. रोहा मुरुड मार्गावर चणेरा नावाचे गाव आहे. रोह्यापासून १८ कि.मी. वर तर मुरुड पासून ५ कि.मी. वर चणेरा गाव ५ कि.मी. वर चणेरा गाव आहे. चणेरा गावापासून बिरवाडी गाव ५ कि.मी. वर आहे. बिरवाडी हे पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास पायवाटा आहे. बिरवाडी गावातून किल्ला गाठण्यास अर्धा तास लागतो.

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र बिरवाडी गावात असणाऱ्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपल्यालाच करावी लागते. गडावर बारामही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. किल्ल्यावर पोहचण्यासाठी बिरवाडी गावातून अर्धातास लागतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.