आरती करू गोपाळा - विष्णूची आरती

आरती करू गोपाळा, विष्णूची आरती - [Aarti Karu Gopala, Vishnuchi Aarti] आरती आरती करू गोपाळा, मी तू पण सांडोनी वेळोवेळा.

आरती आरती करू गोपाळा, मी तू पण सांडोनी वेळोवेळा

आरती आरती करू गोपाळा ।
मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥ ध्रु० ॥

आवडी गंगाजळे देवा न्हाणिले ।
भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पिले ॥
अह हा धूप जाळू श्रीहरीपुढे ।
जव जव धूप जळे तव तव देवा आवडे ॥ आरती० ॥ १ ॥

रमावल्लभदासे अहंधूप जाळिला ।
एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥
सोह हा दीप ओवाळू गोविंदा ।
समाधी लागली पाहता मुखारविंदा ॥ आरती० ॥ २ ॥

हरिखें हरीख होतो मुख पाहता ।
प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥
सद्भावालागी बहु हा देव भूकेला ।
रमावल्लभदासे अहं नैवेद्य अर्पिला ॥ आरती० ॥ ३ ॥

फल तांबूल दक्षिणा अर्पिली ।
तया उपरी नीरांजने मांडिली ॥
पंचप्राण पंचज्योति आरति उजळली ।
विश्व हे लोपले तया प्रकाशातळी ॥ आरती० ॥ ४ ॥

आरतीप्रकाशे चंद्रसूर्य लोपले ।
सुरवर नभी तेथे तटस्थ ठेले ॥
देवभक्तपण न दिसे काही ।
ऐशापरी दास रमावल्लभा पायी ॥ आरती० ॥ ५ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.