भीमाशंकर किल्ला

भीमाशंकर किल्ला - [Bhimashanka Fort] पुण्यापासून १२७ किमी अंतरावर असलेले भीमाशंकर, बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर असलेले भीमाशंकर हे स्थान घनदाट जंगलाने वेढलेले आहे. तीन साडेतीन फूट लांबीची शेकरु ही तांबुस रंगाची खार या जंगलाचे प्रमुख आकर्षण मानले जाते.
भीमाशंकर किल्ला - Bhimashanka Fort

पुण्यापासून १२७ किमी अंतरावर असलेले भीमाशंकर, बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे

भीमाशंकर किल्ला - [Bhimashanka Fort] पुण्यापासून १२७ किमी अंतरावर असलेले भीमाशंकर, बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमेचे उगमस्थान असलेले क्षेत्र भीमाशंकर पुणे आणि मुंबईहूनही भीमाशंकर साठी राज्य परिवहन बससेवा आहे. मंचरहून घोडेगावसाठी फाटा फुटतो. घोडेगावहून पुढे पोखरी घाटाने वर चढले की भीमाशंकर येते. वाटेत डिंभे धरणाचेही दर्शन घडते.
समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर असलेले भीमाशंकर हे स्थान घनदाट जंगलाने वेढलेले आहे. तीन साडेतीन फूट लांबीची शेकरु ही तांबुस रंगाची खार या जंगलाचे प्रमुख आकर्षण मानले जाते. बिबट्या, सांबर, रानडुकरे, तरस, मुंगुस, रानगाय, साळिंदर, भेकर असे वन्यजीवन येथे आढळते. तसेच कोकिळ, बुलबुल, मोर, रानकोंबडा आणि गरुड हे पक्षीही येथे आढळतात. येथील जंगलात आंबा, जांभूळ, फणस, हिरडा, बेहडा, कारची, लोहारी, लोखंडी, कढीलिंब यांची दाट झाडे आणि झुडपे सर्वत्र आढळतात.
हनुमानतळे, नागफणा, गुप्त भीमाशंकर, भीमेचे उगमस्थान, मुंबई टोक, सूर्यास्त टोक अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. येथील प्राचीन मंदिराचा नाना फडणवीसांनी जीर्णोद्धार केला. चिमाजी अप्पांनी दिलेली भलीमोठी घंटा येथे आहे.
३५०० फूट उंचीचा रायगड जिल्ह्यातील भिमाशंकरच्या विस्तिर्ण डोंगररांगेतील आणि गिरीदुर्ग प्रकारात गणला जाणारा हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अतिशय कठीण मानला जातो.
भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग. सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेले एक पवित्र देवस्थान. भीमाशंकराचा आजुबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. येथे महाराष्ट्र सरकारचे अभयारण्य आहे.

भीमाशंकर किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंधचा किल्ला, पट्टा, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाईचा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
मंदिर: भीमाशंकराचे मंदिर १२०० ते १४०० वर्षापूर्वीचे असून त्याची बांधणी हेमाडपंथी पद्धतीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिराच्या बाह्यभागात सिंहासनाधिष्ठीत देवता व त्यावर छत्रचामर ढाळणारे त्यांचे सेवक यांच्या मूर्ती आढळून येतात. देवळासमोरच १७२९ सालातील धातूची एक प्रचंड घंटा लटकवलेली आहे. मंदिराच्या आवारात ५ ते २० फूट उंचीची दीपमाळ आहे. या दीपमाळेवर एकशिलालेख आढळतो. पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव भीमा आहे. या भीमेचा उगम याच भीमाशंकरच्या डोंगरावर आहे.

नागफणीचे टोक: घाटाच्या रस्त्याने वर आल्यावर एक तळे लागते. या तळ्याच्या उजव्या बाजूने वर जाणारी वाट आपल्याला हनुमान मंदिराकडे घेऊन जाते. मंदिरावरून सरळ वर जाणाऱ्या वाटेने आपण नागफणीच्या टोकापाशी येऊन पोहोचतो. येथून समोरच उभा असणारा पेठचा किल्ला, पदरचा किल्ला, पेब आणि माथेरानचे पठार दिअते. या निसर्गसौंदर्याच्या दालनातून बाहेर पडताना निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्या समर्थांच्या ओळी आठवतात.

दुमलता संमता गुणमालते ।
सुख मनी सुमनी मन रातले ॥
परम सुंदर ते खग बोलती ।
गमतसे वसती कमलापती ॥

भीमाशंकर: राम मंदिराच्या डाव्या बाजूने एक पाण्याची वाट काली उतरते. या वाटेने सरळ गेल्यास आपण घनदाट जंगलात प्रवेश करतो. पुढे २५ मिनिटानंतर एक मंदिर लागते. या मंदिरापासून डावीकडे उतरणारी वाट आपणास पाण्यामुळे तयार झालेल्या पिंडीकडे घेऊन जाते. यालाच गुप्त भीमाशंकर असे म्हणतात. पावसाळ्यात येथे फार मोठा धबधबा तयार होतो.

भीमाशंकर गडावर जाण्याच्या वाटा


भीमाशंकराला जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे. पुणेकरांनी स्वारगेटवरून एस.टी. अथवा ट्रेनने कर्जत गाठावे. कर्जतहून खांडस या गावी यावे खांडस ते कर्जत सुमारे ३४ कि.मी. चे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने येण्याची सोय होते. खांडस गावातून शिडी घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते.

गणेश घाट: खांडस गावातून २ कि.मी. अंतरावर एक पूल लागतो. या पुलापासून उजवीकडे जाणारी कच्च्या रस्त्याची वाट गणेश घाटाची आहे. ही वाटा अत्यंत सोपी आहे. या वाटेने तासभराच्या अंतरावर एकगणेशाचे मंदिर लागते. या वाटेने वर जाण्यास ६ ते ७ तास लागतात.

शिडी घाट: पुलाच्या डावीकडे जाणारा रस्ता आपणास गावात घेऊन जातो. गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते. या वाटेने दीड तासांत ३ शिड्या लागतात. तीसऱ्या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडीमध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र होतात. येथे चहा-पाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यांपाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते.


भीमाशंकराला जाण्यासाठी वर गावापर्यंत डांबरी सडक बांधलेली आहे. या साठी पुणे-तळेगाव-चाकण मार्गे भीमाशंकरला पोहचावे.भीमाशंकर गावा बाहेर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हॉटेल आहेत येथे राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. गावात घरगुती पण महागडी अशी रहाण्याची सोय पण होते. पावसाळ्यात मात्र रहाण्याची गैरसोय होते.भीमाशंकरला जेवणासाठी हॉटेल्स आहेत येथे जेवणाची सुयोग्य व्यवस्था होऊ शकते. येथे विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. भीमाशंकरला जाण्यासाठी गणेश घाट ६ ते ७ तास आणि शिडी घाट ४ तास इतका वेळ लागतो. गणेश घाट सोप्पा असुन शिडी घाट हा कठीण आहे.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

1 टिप्पणी

  1. Got nice information here love it
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.