डोळ्यातले चांदणे - मराठी गझल

डोळ्यातले चांदणे, मराठी गझल - [Dolyatale Chandane, Marathi Ghazal] डोळ्यातले चांदणे अजूनही फिके फिकेच आहे, गल्का तेवढा पाखरांचा.

डोळ्यातले चांदणे अजूनही फिके फिकेच आहे

डोळ्यातले चांदणे अजूनही फिके फिकेच आहे
गल्का तेवढा पाखरांचा तरीही झाड मुके मुकेच आहे

संपेल कधी ही वाट वेडी अंधारलेली
शुभ्रतेला पंख नाही सगळीकडेच धुके धुकेच आहे

काजळी डोळ्यात विझल्या वादळाच्या सर्व खुणा
अंतरीच्या पावलांचे चालणे रूके रूकेच आहे

भोवताली तळपणारे उन्ह हे भासे निखाऱ्यापरी
बहरवेड्या अंतरंगाचे लहरणे फुके फुकेच आहे
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.