मार्क्स - एक खडूस आजोबा - मराठी कविता

मार्क्स - एक खडूस आजोबा, मराठी कविता - [Marx Ek Khadus Aajoba, Marathi Kavita] मार्क्साजोबा, तुला का वाचले काही कळतच नाही.
मार्क्स - एक खडूस आजोबा - मराठी कविता | Marx Ek Khadus Aajoba - Marathi Kavita

मार्क्साजोबा, तुला का वाचले काही कळतच नाही, हृदयाचं पाखरू तारुण्याच्या दिशेनं वळतच नाही

मार्क्साजोबा, तुला का वाचले काही कळतच नाही
हृदयाचं पाखरू तारुण्याच्या दिशेनं वळतच नाही
कोणी दिला अधिकार सर्वस्वाचा
नशिल्या जबानीची वस्त्र काळवंडण्याचा
माझं चंद्राळी मन भोवऱ्यात टाकून
माशुकी स्वप्नाची बरबादी करण्याचा
कोण कुठला खडूस आजोबा तू
भारभार ग्रंथ वाचणारा
उभ्या जगाचे दारिद्र्य घोटून
पचवून ग्रंथी सांगणारा
किती आक्रोशी थंड पिच्छा
शब्दांच्या मर्त्य कुशीमधून
कॉलेज घर अन्‌ उभं जग माझं
भोवंडून गेलं, गेलं झिंगून
तुम्हीच आजोबा लागता मागे
शब्दांच्या कैफी नशेमधून
जिंदगीची ही तमाम अदाकारी
माझ्या पोकळीत जाते भंगून
पैशाची खळखळ मला गुंगवत नाही
साडीची सळसळ मला थांबवत नाही
हिंदुस्थानींची ही अंतिम सत्ये
मला कधी झुलवत नाहीत
म्हणूनच मार्क्साजोबा तू खडूस असलास
तरीही माझाच आहेस!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.