कसे - मराठी कविता
कसे, मराठी कविता - [Kase, Marathi Kavita] कसे देवू दान तुला, हात माझे रिते रे.
कसे देवू दान तुला, हात माझे रिते रे
कसे देवू दान तुला
हात माझे रिते रे
कसे ढाळू अश्रू तरी
नेत्र झाले कोरडे रे
कशी काढावी समजूत
ओठ माझे बंद रे
कशी येऊ तुजसमोर
पाय साखळदंड रे
काय बोलू तुज सवे
शब्द झाले मुके रे
मराठी कविता या विभागात लेखन.