माया - मराठी कविता

माया, मराठी कविता - [Maya, Marathi Kavita] जैसे बांधावे उमले, तैशा फुटती रे लाह्या, माया बांधावी प्रेमाशी, तव लागे पूर वहाया.

जैसे बांधावे उमले, तैशा फुटती रे लाह्या, माया बांधावी प्रेमाशी, तव लागे पूर वहाया

जैसे बांधावे उमले
तैशा फुटती रे लाह्या
माया बांधावी प्रेमाशी
तव लागे पूर वहाया
भुकेलेल्या जैशी कळे
खरी अन्नाची किंमत
तैशीच असे जनी
मायेची गं गत
फोल पाखडता सूप
रिते राहती हात
तैसे मायेवीण भासे
सुने सारे जगत
माया दिल्याने वाढते
सारे जग ती व्यापते
रिक्त मनी कमी होते
जैशी कसर तोडते
मायेची कूस कधी
नसते रे वांझ
तिला नसते कधी
दिवस वा सांज


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.