व्हेजिटेबल बिर्याणी - पाककृती

व्हेजिटेबल बिर्याणी, पाककला - [Vegetable Biryani, Recipe] वेगवेगळ्या भाज्या आणि पनीर यांमुळे व्हेजिटेबल बिर्याणी चवीला खमंग लागते. तसेच लहान मुलांना भाज्या खायला देण्यासाठी हा पर्याय योग्य ठरेल.
व्हेजिटेबल बिर्याणी- पाककला | Vegetable Biryani - Recipe

वेगवेगळ्या भाज्या आणि पनीरयुक्त ‘व्हेजिटेबल बिर्याणी’

‘व्हेजिटेबल बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाटी तांदूळ
 • २ कांदे
 • १ कप मटार सोललेला
 • २ गाजर
 • १ वाटी पनीर चौकोनी चिरलेले
 • २ बटाटे
 • १ लहान फ्लॉवर
 • ४ टॉमेटो
 • २ हिरवी मिरची
 • १ तुकडा आले
 • ४ चमचे तूप
 • थोडेसे काजू
 • १/२ लहान चमचा जीरे
 • १/२ चमचा लाल तिखट
 • १/२ लहान चमचा हळद
 • ४ लवंग
 • ४ हिरवी वेलची
 • २ तुकडे दालचिनी
 • १/२ लहान चमचा केशर
 • १/२ कप दूध
 • मीठ चवीप्रमाणे

‘व्हेजिटेबल बिर्याणी’ची पाककृती

 • तांदूळ धुऊन शिजवून घ्या.
 • कांदा बारीक चिरा.
 • कढईत तूप गरम करुन कांदा परता, गुलाबी झाल्यावर लवंग, वेलची, दालचिनी वाटून टाका.
 • जीरे, आले व हिरवी मिरची वाटून टाका. परतून टॉमेटोची पेस्ट टाका.
 • लाल तिखट, हळद व मीठ टाका.
 • मसाला चांगला परतून झाल्यावर बटाटा, फ्लॉवर व गाजर चिरून टाका. 
 • नीर व मटार टाका. भाज्या थोड्या शिजल्यावर गॅस बंद करा.
 • एका वाटीत १/२ कप दूध घेऊन त्याच्यात केशर भिजवा.
 • शिजलेल्या भातात मीठ टाका.
 • आता वाढायच्या भांड्यात खाली भात टाका. त्याच्यावर दूध, उरलेली भाजी टाका.
 • आता बाकीचा भात टाकून दूध टाका.
 • भातावर गोल टॉमेटो - कांदा व अख्खी हिरवी मिरची टाकून सजवा.
 • झकण ठेवून कमी गॅसवर २ - ३ मिनीटे शिजवा व गरम वाढा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.