पांढरे कांदे व कैरीचे लोणचे - पाककृती
पांढरे कांदे व कैरीचे लोणचे, पाककला - [Pandhare Kande Va Kairiche Lonche, Recipe] तेलाशिवाय केलेले ‘पांढरे कांदे व कैरीचे लोणचे’ चवीला छानही लागते.
तेलविरहीत चटपटीत ‘पांढरे कांदे व कैरीचे लोणचे’
‘पांढरे कांदे व कैरीचे लोणचे’साठी लागणारा जिन्नस
- २ वाट्या पांढरे कांदे उभ्या फोडी
- ३ वाट्या कैऱ्या उभ्या फोडी
- मीठ
- तिखट
- साखर चवीनुसार
- हळद
‘पांढरे कांदे व कैरीचे लोणचे’ची पाककृती
- कांद्याच्या व कैरीच्या उभ्या फोडी करून घ्याव्यात.
- दोन्ही फोडी एका भांड्यात एकत्र कराव्यात.
- त्यात मीठ, तिखट, चवीनुसार साखर व हळद घालावी.
- तयार मिश्रण बरणीत भरून दर दोन दिवसांनी हलवावं.
- ह्या लोणच्याला छान रस सुटतो.
- पांढरे कांदे व कैरीचे लोणचे लोणचे तयार आहे.
- तेलाशिवाय केलेले पांढरे कांदे व कैरीचे लोणचे चवीला छानही लागते.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.