Loading ...

अंडा पराठा - पाककृती

अंडा पराठा, पाककला - [Egg Paratha, Recipe] चविष्ट आणि अंड्याचा वेगळा प्रकार म्हणजेच ‘अंडा पराठा’ सर्वांनाच आवडेल.

अंडा पराठा - पाककला | Egg Paratha - Recipe

खमंग, चविष्ट ‘अंडा पराठा’

‘अंडा पराठा’साठी लागणारा जिन्नस

  • २ वाट्या कणीक
  • मीठ
  • ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा

आतील सारणासाठी लागणारा जिन्नस

  • ३-४ अंडी
  • १ कांदा
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ चमचा गरम मसाला
  • मीठ

‘अंडा पराठा’ची पाककृती

  • अंडी फोडुन घ्यावीत.
  • थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा.
  • नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, गरम मसाला घालून हलवावे.
  • अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे.
  • कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.
  • कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे.
  • नंतर त्याच्या दोन पुर्‍या लाटून घ्याव्यात.
  • एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी.
  • कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे.
  • नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.
  • गरमागरम अंडा पराठा सॉस सोबत सर्व्ह करावा.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची