सुकी उडीद डाळ - पाककृती

सुकी उडीद डाळ, पाककला - [Suki Udid Dal, Recipe] उडीद डाळीत टोमॅटो, मसाला वगैरे घालून चटपटीत, पोष्टिक असलेली तसेच घरात भाजी नसल्यावर झटपट बनवता येणारी ‘सुकी उडीद डाळ’ चपाती, पराठ्यासोबत खायला देऊ शकता.
सुकी उडीद डाळ - पाककला | Suki Udid Dal - Recipe

चटपटीत, पोष्टिक व झटपट होणारी सुकी उडीद डाळ

‘सुकी उडीद डाळ’साठी लागणारा जिन्नस

 • १ कप धुतलेली उडीद डाळ
 • १ कापलेला कांदा
 • १ मोठा चमचा तेल
 • ३/४ चमचे मीठ
 • १/२ चमचे हळद
 • २ मोठी वेलची
 • १ चमचे जीरे
 • १ जुडी कापलेली कोथिंबीर
 • २ हिरवी मिरची
 • १ कापलेला टोमॅटो
 • १/२ चमचे गरम मसाला

‘सुकी उडीद डाळ’ची पाककृती

 • डाळीस धुवुन ४ कप पाण्यात हळद व मीठाबरोबर शिजवून द्यावे आणि गाळून पाणी वेगळे करावे.
 • तेल गरम करून जीरे टाकावे.
 • नंतर वेलची टाकून १ मिनीट फ्राय करावे.
 • कांदा टाकुन लालसर फ्राय करावा.
 • कांदा लालसर झाल्यावर उडीद डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व गरम मसाला टाकुन परतून घ्यावे.
 • झाकण ठेवून ३ - ४ मिनीट गॅस कमी करून शिजवावे.
 • वरून कोथिंबीर पेरावी आणि उतरवून घ्यावे.
सुकी उडीद डाळ रोटी, पराठ्यासोबत खाऊ शकता.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.