मालवणी मसाला - पाककृती

मालवणी मसाला, पाककला - [Malvani Masala, Recipe] मुळचा कोकणातल्या मालवणचा असलेला हा ‘मालवणी मसाला’ रंगाने अत्यंत लालसर आणि चवीला तितकाच तिखट असतो. ‘मालवणी मसाला’ हा मुख्यतः झणझणीत आणि तिखट पदार्थ बनविण्यासाठी वापरला जातो.
मालवणी मसाला- पाककला | Malvani Masala - Recipe

खास मांसाहारी पदार्थ व तिखट पदार्थ करण्यासाठी ‘मालवणी मसाला’ वापरला जातो

‘मालवणी मसाला’साठी लागणारा जिन्नस

 • १/२ किलो धणे
 • १० ग्रॅम दालचिनी
 • १० ग्रॅम लवंग
 • १० ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
 • १० ग्रॅम नागकेशर
 • १० ग्रॅम तमालपत्रे
 • १० ग्रॅम जीरे
 • १० ग्रॅम मोहरी
 • १० ग्रॅम काळे मिरे
 • १० ग्रॅम बडीशेप
 • ४ - ५ मसालेचे वेलदोडे
 • ५ ग्रॅम जायपत्री
 • ५ ग्रॅम शहाजिरे

‘मालवणी मसाला’ची पाककृती

 • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
 • सर्व साहित्य थोडया तेलावर भाजून घ्या.
 • भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
 • थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्या.
 • तयार मालवणी मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.हेमा चिटगोपकर | Hema Chitgopkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
पाककला या विभागात लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.