गोडा मसाला - पाककृती

गोडा मसाला, पाककला - [Goda Masala, Recipe] तीळ, खोबरे, खसखस सारखे पदार्थ वापरून बनविलेला ‘गोडा मसाला’ चवीला काहीसा गोडसरच असतो. मटकीची उसळ, कटाची आमटी, मिसळ पाव, आमटी डाळ, भरली भेंडी, तोंडलीची भाजी सारख्या व्यंजनामध्ये ‘गोडा मसाला’ आवर्जून वापरला जातो.
गोडा मसाला- पाककला | Goda Masala - Recipe

उसळी तसेच भरली भाज्या करण्यांसाठी वापराला जाणारा चवीला गोड असणारा गोडा मसाला

‘गोडा मसाला’साठी लागणारा जिन्नस

 • १/२ किलो धणे
 • १/४ किलो सुकं खोबरं
 • १/४ किलो तीळ
 • ५० ग्रॅम खसखस
 • ५० ग्रॅम हळकुंड
 • २० ग्रॅम लवंग
 • २० ग्रॅम दालचीनी
 • २० ग्रॅम काळे मिरे
 • २० ग्रॅम तमाल पत्र
 • २० ग्रॅम मसाला वेलदोडे
 • २० ग्रॅम दगड फुल
 • २० ग्रॅम खडा हिंग
 • १० ग्रॅम जायपत्री
 • १० ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
 • १०० ग्रॅम जीरे

‘गोडा मसाला’ची पाककृती

 • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
 • खोबर्‍याचे तुकडे करून किसून भाजून घ्या.
 • तीळ कोरडेच भाजून घ्या.
 • बाकीच सर्व पदार्थ थोडया तेलावर वेगवेगळे भाजून घ्या.
 • गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा व चाळून घ्या.
 • तयार गोडा मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरा.हेमा चिटगोपकर | Hema Chitgopkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
पाककला या विभागात लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.