पंजाबी गरम मसाला - पाककृती
पंजाबी गरम मसाला, पाककला - [Punjabi Garam Masala, Recipe] हे अतिशय औत्सुक्याचे आहे की दररोजचे शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी ‘पंजाबी मसाला’ घरोघरी सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो. सोबतच दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय व्यंजनांमध्ये देखील या मसाल्याचा उपयोग प्रकर्षाने केला जात असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, पंजाबी छोले, पनीर टिक्का, पनीर बटर मसाला, बटर चिकन, चिकन टिक्का ईत्यादी.
उत्तर भारतीय व्यंजन करण्यासाठी पंजाबी गरम मसाला
‘पंजाबी गरम मसाला’साठी लागणारा जिन्नस
- १ टी. स्पून धणे
- १ टी. स्पून शहाजिरे
- ४ - ५ तमालपत्रे
- १/२ टी. स्पून दालचिनी
- १/२ टी. स्पून काळे मिरे
- १/२ टी. स्पून लवंग
- ५ मसालेचे वेलदोडे
- १/४ जायफळ
- १/२ टीस्पून जीरे
‘पंजाबी गरम मसाला’ची पाककृती
- प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
- जायफळ सोडून सर्व मसाले कोरडेच भाजून घ्या (फार भाजू नका).
- गार झाल्यावर जायफळ सहित मिक्सरमध्ये बारीक पूड करा व चाळून घ्या.
- तयार पंजाबी गरम मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरा.