स्पेशल गरम मसाला - पाककृती
स्पेशल गरम मसाला, पाककला - [Special Garam Masala, Recipe] महाराष्ट्रातील प्रत्येक स्वयंपाक घरात अगदी सहज सापडणारा असा हा ‘स्पेशल गरम मसाला’.
स्वयंपाक घरात सहज सापडणारा स्पेशल गरम मसाला
‘स्पेशल गरम मसाला’साठी लागणारा जिन्नस
- १/४ किलो काळे जीरे
- १०० ग्रॅम खसखस
- ५० ग्रॅम दालचिनी
- ५० ग्रॅम लवंग
- १०० ग्रॅम बडीशेप
- ४ - ५ मसाला वेलदोडे
- ४ - ५ हिरवे वेलदोडे
- २ ग्रॅम दगड फूल
- १/२ जायफळ
- २ - ३ बाद्यान (बदामफुले)
‘स्पेशल गरम मसाला’ची पाककृती
- प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
- सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या.
- भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
- थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक पूड करुन घ्या.
- तयार स्पेशल गरम मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.