चहाचा मसाला - पाककृती

चहाचा मसाला, पाककला - [Chahacha Masala, Recipe] एक उत्तम आणि उत्कृष्ट चहा बनविण्यामागे प्रत्येकाच्या ‘चहा मसाल्याचे’ एक गुपीत असतेच असते. शिवाय असा चहा आरोग्यास लाभकारी देखील असतो. आपल्याला असा मसालेदार चहा थंडी किंवा पावसाळी दिवसात अधिक हवा हवासा वाटतो.
चहाचा मसाला- पाककला | Chahacha Masala - Recipe

आरोग्यास लाभकारी आणि मसालेदार चहाचा मसाला

‘चहाचा मसाला’साठी लागणारा जिन्नस

 • १५० ग्रॅम सुंठ
 • ५० ग्रॅम काळे मिरे
 • २५ ग्रॅम लवंग
 • २५ ग्रॅम दालचिनी
 • ५० ग्रॅम हिरवे वेलदोडे
 • १ जायफळ

‘चहाचा मसाला’ची पाककृती

 • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
 • सर्व साहित्य हलकेसे भाजून घ्या.
 • भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
 • थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक पूड करुन घ्या.
 • तयार चहा मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.हेमा चिटगोपकर | Hema Chitgopkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
पाककला या विभागात लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.