कच्चा मसाला - पाककृती
कच्चा मसाला, पाककला - [Kaccha Masala, Recipe] फिश करी सारख्या खमंग आणि लज्जतदार पदार्थ बनविण्यासाठी ‘कच्चा मसाला’ सर्वाधिक वापरला जाणारा मसाल्याचा प्रकार आहे. या मसाल्यातील कोणताही घटक हा तळलेला किंवा भाजलेला नसतो म्हणुन त्याला कच्चा मसाला म्हणतात.
खमंग आणि लज्जतदार पदार्थ बनविण्यासाठी कच्चा मसाला
‘कच्चा मसाला’साठी लागणारा जिन्नस
- १/२ वाटी धणे
- १/४ वाटी जीरे
- ५ ग्रॅम शहाजिरे
- ५ ग्रॅम लवंग
- १ तुकडा दालचिनी
‘कच्चा मसाला’ची पाककृती
- प्रथम वरील सर्व साहित्य निवडुन घ्या.
- सर्व साहित्य कच्चेच मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
- तयार कच्चा मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
- हा कच्चा मसाला खिचडी व मसाले भात यासाठी वापरावा.