पनीर रसमलाई - पाककृती

पनीर रसमलाई - [Paneer Rasmalai] मुळात बंगालचा असलेला ‘पनीर रसमलाई’ हा मध्यम गोड पदार्थ आहे.
पनीर रसमलाई- पाककला | Paneer Rasmalai - Recipe

लहान मुलांना आवडणारा बंगाली गोड पदार्थ पनीर रसमलाई

‘पनीर रसमलाई’साठी लागणारा जिन्नस


 • १ लीटर दूध
 • ४ वाट्या साखर
 • १ कंडेन्सड मिल्कचा डबा
 • २ ते ३ कप सायीसकट दूध
 • ४ - ५ वेलदोड्याची पूड
 • थोडी केशराची पूड
 • १ टेबलस्पून मैदा.

‘पनीर रसमलाई’ची पाककृती


 • १ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा.
 • उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.
 • दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा.
 • पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.
 • परातीत हे नासलेले दूध व मैदा एकत्र करुन खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.
 • एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा.
 • पाकाला उकळी आली की त्यात वरील गोळे सोडा.
 • गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवून गार होऊ द्या.
 • एका भांड्यात कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा.
 • वेलदोड्याची पूड व केशर घालून वरील गार झालेले गोळे सोडा. तयार आहे ‘पनीर रसमलाई’.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.