जिलेबी - पाककृती

जिलेबी, पाककला - [Jalebi, Recipe] गोड पदार्थ म्हणून सणासुदीला, लग्न समारंभाला तसेच महाराष्ट्रात १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला खाल्ली जाणारी सर्वांना आवडणारी जिलेबी.
जिलेबी- पाककला | Jilebi - Recipe

लग्न समारंभाला तसेच सणासुदीचा गोड पदार्थ म्हणजे जिलेबी

जिलेबीसाठी लागणारा जिन्नस


 • १ फुलपात्र रवा
 • १ फुलपात्र मैदा
 • ३ टेबलस्पून आंबट दही
 • २ टेबलस्पून पातळ डालडाचे मोहन
 • पाव वाटी डाळीचे पीठ
 • पीठ भिजवण्यासाठी कढत पाणी
 • ३ फुलपात्रे साखर
 • ३ फुलपात्रे पाणी
 • २ लिंबे
 • थोडा केशरी रंग
 • केशर

जिलेबीची पाककृती


 • रवा, मैदा, दही डाळीचे पीठ व डालडा एकत्र करून कढत पाण्याने पीठ भिजवावे.
 • भज्याच्या पिठापेक्षा जरा घट्ट असावे. पिठाची गुठळी राहू देऊ नव्हे.
 • नंतर हे पीठ रात्रभर झाकून ठेवा.
 • दुसऱ्या दिवशी साखरेत पाणी घालून पाक करावा. त्यात लिंबाचा रस घाला.
 • कढईत तूप घालून गॅसवर ठेवावे.
 • पीठ खूप घोटून घ्यावे व जिलेबी करायच्या प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा पिशवीत भरावे.
 • नंतर एका धारेने सावकाश जिलब्या घालाव्या, उलटाव्या व नंतर पाकात टाकाव्या.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.