सांबर - पाककृती
सांबर, पाककला - [Sambar, Recipe] दक्षिण भारताची प्रसिद्ध आमटी म्हणजेच सांबर जे ईडली, डोसा, मेदुवडा तसेच भातासोबत खाल्ली जाते.
दक्षिण भारताची प्रसिद्ध आमटी ‘सांबर’.
‘सांबर’साठी लागणारा जिन्नस
- २५० गॅम तुरडाळ
- १/२ लहान चमचा मोहरी
- १/२ लहान चमचा हळद पावडर
- १ लहान चमचा धणे पावडर
- ५० ग्रॅम चिंच
- १/२ लहान चमचा गरम मसाला
- १ लहान चमचा मेथीदाणा
- १ लहान चमचा तांदूळ
- १/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
- ४ कांदे
- १ हिरवी मिरची
- २ मोठे चमचे तूप
- ४ टॉमॅटो
- १ तुकडा आले
- थोडीशी उडीद डाळ
- थोडीशी चणाडाळ
‘सांबर’ची पाककृती
- तूरडाळ १ तास भिजवून नंतर मीठ, हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या.
- आता एका कढईत तेल/तूप न टाकता मेथीदाणा, उडीद डाळ, चणाडाळ, व तांदूळ भाजून घ्या.
- गॅस बंद करून धणे पावडर व लाल तिखट टाकून ५ मिनीटे झाकून ठेवा. हे सर्व वाटून घ्या.
- कांदा, टॉमेटो, आलं व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
- एका कढईत तूप गरम करून मोहरीची फोडणी द्या.
- कांदा परतून, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता टाका. आता टॉमेटो टाकून नीट परतून घ्या.
- सर्व मसाले टाकून भाजून घ्या व गॅस बंद करा.
- हे सर्व मसाले उकडलेल्या डाळीत मिक्स करा.
- त्यानंतर डाळीमध्ये (सांबरमध्ये) भाज्या टाकून उकळी काढून इडली, मेदूवडा किंवा डोसा सोबत गरमागरम सर्व्ह करा.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.