काजूची बर्फी - पाककृती

काजूची बर्फी, पाककला - [Kaju Barfi, Recipe] खोबरे आणि तुप यामुळे ‘काजूची बर्फी’ अधिक खमंग लागते, सणावाराला हमखास केला जाणारा हा पदार्थ आहे. काजू हे उष्ण आणि पित्तवर्धक असल्याने पित्तचा विकार असल्यास हा पदार्थ बेताने खाल्यासच बरे. थंडीच्या दिवसात मात्र हा पदार्थ आवर्जून खावा. छोट्यांचा तर हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे.
काजूची बर्फी- पाककला | Kaju Barfi - Recipe

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा गोड पदार्थ ‘काजूची बर्फी’

‘काजूची बर्फी’साठी लागणारा जिन्नस

 • १०० ग्रॅम काजू तुकडा
 • १ नारळ
 • २ वाट्या साखर
 • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
 • २ टेबल चमचा तूप.

‘काजूची बर्फी’ची पाककृती

 • नारळ खरवडून घ्या.
 • काजू थोडा वेळ पाण्यात भिजत घाला. नंतर वाटून घ्या. खोबरेही वाटून घ्या.
 • एका जाड बुडाच्या पातेल्यात खोबरे, काजू व साखर एकत्र करा.
 • मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहा.
 • दाटसर होत आले की इसेन्स घाला. कडेने तूप सोडा.
 • मिश्रण चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओता व थापा. नंतर वड्या पाडा.
 • असल्यास वरून चांदीचा वर्ख लावा.
 • तयार आहे काजूची बर्फी.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.