अळूची भाजी - पाककृती

अळूची भाजी, पाककला - [Aluchi Bhaji, Recipe] महाराष्ट्रात खास करून लग्नसमारंभात ‘अळुची भाजी’ केली जाते. कोकणात याला ‘अळुचं फदफदं’ असेही म्हणतात. अळु आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
अळूची भाजी - पाककला | Aluchi Bhaji - Recipe

महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबट गोड अळूची भाजी

‘अळूची भाजी’साठी लागणारा जिन्नस
 • ८-१० अळूची पाने
 • अर्धा डाव चणा डाळ
 • १५-२० शेंगदाणे
 • ८-१० काजूचे तुकडे
 • ४-५ हिरव्या मिरच्या
 • ८-१० पाने कडीपत्ता
 • अर्ध्या लिंबाएवढी चिंच
 • लिंबाएवढा गूळ
 • अर्धा चमचा डा मसाला
 • ८-१० मेथ्याचे दाणे
 • मीठ
 • १ डाव डाळीचे पीठ
 • २ पळ्या तेल
 • फोडणीचे साहित्य

‘अळूची भाजी’ची पाककृती
 • अळूची पाने व देठे धुवून चांगली चिरून घ्यावीत.
 • १ पळीभर तेलात मिरच्याचे तुकडे व मेथ्याचे दाणे घालून चिरलेला अळू टाकून चांगली मऊ होईपर्यंत परतावी.
 • आता त्यात भिजलेली चणा डाळ, शेंगदाणे घालावेत. सर्व वाफवून घ्यावे.
 • चिंच, गूळ, मसाला, मीठ, डाळीचे पीठ पाण्यात कालवून भाजीमध्ये टाकावे.
 • भाजी उकळली की एका पळीत तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जीरे, हिंग, हळद, कढिपत्ता घालून फोडणी करावी व ती भाजीवर ओतावी.
 • तयार आहे आंबट गोड अळुची भाजी.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.