चिकनचे धिरडे - पाककृती

चिकनचे धिरडे, पाककला - [Chicken Dhirade, Recipe] मांसाहारी खवय्यांसाठी वेगळ्या प्रकारची मेजवानी म्हणजे ‘चिकनचे धिरडे’ जे तुम्ही किंवा लहान मुले न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाऊ शकतात.
चिकनचे धिरडे - पाककला | Chicken Dhirade - Recipe

खास मांसाहारी व्यक्तिंसाठी चिकनचे धिरडे

‘चिकनचे धिरडे’साठी लागणारा जिन्नस

 • १ कप मैदा
 • १ अंडे
 • १ १/२ कप दूध
 • १/२ चमचा मीठ

आत भरण्यासाठी लागणारा जिन्नस

 • १ १/२ कप चिकन
 • १ कांदा
 • १ बटाटा
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • २-३ लसूण पाकळ्या
 • १ लहान आल्याचा तुकडा
 • चवीनुसार मीठ
 • हळद
 • १/२ चमचा गरम मसाला

चिकनचे धिरडेची पाककृती

 • मैद्यामध्ये अंडे, मीठ व दूध घालून बॅटर बनवून घ्यावे.
 • चिकन बारीक चिरुन शिजवून घ्यावे.
 • कांदा बारीक चिरुन घ्यावा.
 • थोड्या तेलावर कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर त्यात शिजलेले चिकन, वाटलेले आले - लसूण, चवीनुसार मीठ, गरम मसाला, मिरच्या घालून कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे.
 • आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून सारखे करुन ठेवावे.
 • गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून बेताच्या आकाराची धिरडी घालून घ्यावीत.
 • खालच्या बाजुने चांगली भाजून घ्यावीत.
 • धिरडी परतू नयेत.
 • धिरड्यांच्या मध्यभागी तयार चिकन घालून धिरड्यांची डोशाप्रमाणे घडी करुन गरमागरम सर्व्ह करावीत.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.