ब्रेड कटलेट - पाककृती
ब्रेड कटलेट, पाककला - [Bread Cutlet, Recipe] ‘ब्रेड कटलेट’ हे आपण नाश्त्यामध्ये, मधल्या वेळेत किंवा लहान मुलांना टिफीनमध्ये देता येऊ शकतो, झटपट बनवता येणारे ब्रेड कटलेट लहान मुलांना नक्कीच आवडतील.
खास लहान मुलांसाठी तसेच झटपट करता येणारे चटपटीत ब्रेड कटलेट
‘ब्रेड कटलेट’साठी लागणारा जिन्नस
- १० स्लाइस ब्रेड
- ४ हिरव्या मिरची
- १/२ कप कोथिंबीर
- १ तुकडा आले
- मीठ चवीनुसार
- १०० ग्रॅम चीज
- तळण्याकरता तेल
‘ब्रेड कटलेट’ची पाककृती
- हिरवी मिरची व आले बारीक वाटून घ्या.
- कोथिंबीर बारीक चिरा,
- चीज किसणीने किसून घ्या.
- ब्रेड चे स्लाइस पाण्यात बुडवून लगेच काढून घ्या.
- हाताने दाबुन त्याचे पाणी काढून त्यांना हातने कुस्करा.
- त्यामध्ये हिरव्या मिरची, कोथिंबीर, आलं, मीठ मिसळून मिश्रण एकत्र करा.
- आता थोडेसे मिश्रण हातावर घ्या त्याच्या मधोमध चीज ठेऊन परत बंद करा.
- तुम्हाला आवडतील त्या आकारात लहान-लहान कटलेट तयार करा.
- एका कढईत तेल गरम करून कटलेट तळून घ्या.
- गरम-गरम ब्रेड कटलेट टोमॅटो सॉस व हिरव्या चटणी बरोबर वाढा.
ब्रेड कटलेट चवीला फार चटपटीत लागतात. तुम्ही घरी किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून वाढू शकता.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.