Loading ...
/* Dont copy */

शहर - मराठी कविता

शहर, मराठी कविता - [Shahar, Marathi Kavita] पलिकडच्या जंगलातील, माझ्या माध्यावरून भिरभिरणारे चांदणे, येथे विसावते.

पलिकडच्या जंगलातील, माझ्या माध्यावरून भिरभिरणारे चांदणे, येथे विसावते

पलिकडच्या जंगलातील
माझ्या माध्यावरून भिरभिरणारे चांदणे
येथे विसावते
अन्‌ अचानक हे शहर वसताना मी पाहतो

(दूर राहिलेल्या जंगलतील झाडांची हलती पाने
मी खुडून घेतली होती मुठी म्हणून बरे!)

शहरांच्या धमन्यातील रक्ताचा मागोवा घेत
मी वाळू हरवलेल्या समुद्रात उतरतो

उन्हे सरपटत राहतात माझ्या खारट शरीरावरून
अन्‌ मी या ओहटलेल्या समुद्रावरुन ओहटत

माझ्यापुढे आता काही पर्याय आहेत
पुढे जावे तर सुसाट वारा आकाशाचे तुकडे
माझ्या पाठीवर देईल
मागे तर शहराला भरती यायची वेळ झाली आहे

पर्याय म्हणून मी शहराकडे पाठ करून
समुद्रावर हलका हलका पसरत जातो


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची