फणफणलेल्या रात्रीच्या - मराठी कविता

फणफणलेल्या रात्रीच्या, मराठी कविता - [Phanphanlelya Ratrichya, Marathi Kavita] फणफणलेल्या रात्रीच्या मळक्या गाडीला आठवून, आणि कोमट सकाळ हेड ऑफिसातली.

फणफणलेल्या रात्रीच्या मळक्या गाडीला आठवून, आणि कोमट सकाळ हेड ऑफिसातली

फणफणलेल्या रात्रीच्या मळक्या गाडीला आठवून
आणि कोमट सकाळ हेड ऑफिसातली
महाराष्ट्र टाईम्स रंगीत मुठीत बंद झाला तेव्हा
फुटपाथवर जुने अंक डेबोनेरचे चाळून काढले
आईचा म्हातारा त्रागा, बहिणीचं
पेंडिंग लग्न, बायकोच्या किडनीवरची सूज
लहान मुलीचे वरचे दोन दात आणि
माझं छाताड खोल आत मुडपलेलं
विचार केला तेव्हा झाला त्रास.. पाहिला स्त्या.
हिंसा काळजाच्या गटारात चोकप चोकप
वाईट लिहिल्यावर खुन्नस आली बायकोची
पोटऱ्या दुखल्या म्हणून दारू प्यायलो फुकटची
संध्याकाळी जसलोकाला गेलो विदाऊट
आईला केव्हाही पान्हा फुटेल म्हणून आत्महत्या
नाही केली, भर समुद्रात.
जगून हिमोग्लोबीन वाढवलं रक्तातलं


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.