Loading ...

स्वागत आठ नोव्हेंबर - मराठी कविता

स्वागत आठ नोव्हेंबर, मराठी कविता - [Swagat Aath November, Marathi Kavita] वाढ वाढ वाढलो, किती? तर -शून्य, आजची तारीख उद्या खोटी.

वाढ वाढ वाढलो, किती? तर -शून्य, आजची तारीख उद्या खोटी

वाढ वाढ वाढलो
किती? तर -शून्य.
आजची तारीख उद्या खोटी.
प्रामाणिक - बिमाणिक
जगलो छत्तीस वर्ष
याला काहीच अर्थ नाही?
की `जगलो' यालाच अर्थ नाही
जमेल तितका समजूतदारपणा असतोच सर्वांच्यात
मग कवी आहे म्हणजे नेमके काय?
तर नेमके नेमके कोणीच नाही
कोणीच नाही मग हे चरित्राचे गाणे कशाला?
यावर मी निरूत्तर
बिना चरित्राचा.
जसा
बिना दारूचा
ड्राय डे च्या दिवशी.
सबब- मी अनोळखी - आजच्या तारखेला.
त्याच्याने पडताच तर पडेल फरक
चरित्र उठून गेल्यानंतरच्या खड्ड्याला.
पण ह्या खोकल्याचे करायचे काय?
चरित्राच्या घशात अडखळतोय सारखा.
छातीत खोकला, छातीत खोकला.
विंडोसिटजवळ निवांत, पण खोकलाच.

अशाने बिनाचरित्राच्या फाईलमधून
वाढदिवस रेकॉर्ड रूपमध्ये जाईल.
चुकत माकत - खोकत खोकत


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची