कविता शब्द गेला गाळून गळून, वापरून केला चपटा
कविता शब्द गेला गाळून गळूनवापरून केला चपटा
कॅरमचा स्ट्राईकर सारखा
कविता गोची करत नाही
छळाचे माध्यम म्हणून
ती मूड निर्माण करत नाही
म्हणून खलास करा तिला
तुमच्या मुडचा परिणाम टांगा
तिला आलेल्या पोकावर
तुमच्या भावना सख्ख्या आईसारख्या
राहिल्या नाहीत कवितेवर
बोनससाठी केलेल्या संपामध्ये
जर तुम्ही भारावलेले असता
तर मग कविता अजून किती भारावणार?
जगण्याचे सारे प्रश्न मरून पडलेत
नाक्यावर
आतातरी आपल्या सवयीच्या
कवितेला वहा श्रद्धांजली
आणि या एक पर्यायी शब्द
जो उठेल ताठरता देईल
काही क्षणांची तरी