एवढं कर - मराठी कविता

एवढं कर, मराठी कविता - [Evadha Kar, Marathi Kavita] एवढं कर, सूर्याच्या मांसल त्वचेवर दिवसांच्या सुया टोच, अंधाराची मेणबत्ती पेटव.

एवढं कर, सूर्याच्या मांसल त्वचेवर दिवसांच्या सुया टोच, अंधाराची मेणबत्ती पेटव

एवढं कर
सूर्याच्या मांसल त्वचेवर दिवसांच्या सुया टोच
अंधाराची मेणबत्ती पेटव
सगळी आत्मचरित्रे दोनदा वाच
एकदा स्तुती, दुसऱ्यांदा कंटाळा
खोट्या चपलेत खोटे पाय घाल
खोटे खोटे फिरून ये
मोकळ्या हवेशी झोंब
दचकून उठ
कविता लिहिण्याचं नाटक कर
न जमल्यास
एक पत्र लिही
फाडून टाक. पुन्हा लिही
नंतर
गिचमिड्या सुईच्या दोरीत
चेहरा ओवीत बस
माझा, अंधाराचा किंवा
आपल्या संबंधीचा


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.