Loading ...

गणपती विसर्जनावरुन परतताना - मराठी कविता

गणपती विसर्जनावरुन परतताना, मराठी कविता - [Ganapati Visarjanavrun Paratatana, Marathi Kavita] एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना.

एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना

गणपती विसर्जनावरून परतताना
मी मोहनसाठी मुलगी पहायला गेलो
सोबत होता
माझा गुलालाने माखलेला शर्ट
आणि व्हाईट कॉलर मोहन
मोहनला राहायचे होते चकाचक
तसे आमच्यात आधीच खूप अंतर
आणि आता रिक्षामध्येही
त्याच्या डोक्यात गुलालाने न माखलेली कचकडी मुलगी
माझ्या तोंडात वाऱ्यावर फुलारलेली सिगारेट
दाढ्या केल्या होत्या तातडीने दोघांनी
जसे लग्न जमणे केवळ अवलंबून असते, दाढीवर
रिक्षाने दाबले ब्रेक्स तरी आडवी गेली मांजर
मोहन हबकायचा तेवढा हबकला
म्हणाला,
‘आजकाल कोणीच पाळत नाही कुणाचंही आडवं जाणं’
रिक्षाला थांबवत पुन्हा म्हणाला,
‘म्युनिसिपाल्टी स्कूल नं. ३ जवळ’
मोहनसाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात
मुलीची मान खाली. मुलगी डबल ग्रॅज्युएट. नोकरीवाली.
मोहन बोल बोल बोलला
पॉझिटिव्ह संधीच्या प्रकाशात
मुलगी गप्प गप्प गप्प राहिली
पॉझिटिव्ह संधीच्या प्रकाशात
मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात
मी गणपती विसर्जनावरून परतल्यानंतरची उदासी वागवत
मोहन प्रचंड आवाजाचा फटाका फुटण्यापूर्वी
कानात बोट घालून

मुलगी पाहून परतताना
मोहन रंगलेला, मला अधिक खेटून
विसर्जनानंतर राहायचे नव्हते चकाचक
डबल ग्रॅज्युएट मुलीलाही मान वर करून

आणि मी
रिकाम्या झालेल्या मखरातील सजावट
रिक्षा रिकामी करताना


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची