सकाळी उठून पाहतो तर, माझ्या अंगणात, तुरुतुरु चालणारं कवितेचं पिल्लू, मरून पडलेलं
सकाळी उठून पाहतो तरमाझ्या अंगणात
तुरुतुरु चालणारं कवितेचं पिल्लू
मरून पडलेलं
त्याच्या खाण्यात एखादा
विषारी शब्दाचा दाणा आला असेल!
किंवा ते कित्येक दिवसाचं उपाशीही असेल
पण इतका हळवा निष्काळजीपणा तसा घातकच
म्हणूनच ‘बेजाबबदार कवी’ म्हणून
द्याल ती शिक्षा मला मान्य आहे
जास्तीत जास्त तुम्ही एका छोट्या पिल्लाची
अमानुष हत्या ह्या आरोपाखाली मला
ठेचून मारू शकाल किंवा एखादं अनियतकालिक काढाल ह्या प्रित्यर्थ
पण पिल्लाचे मरण एखाद्या रोगराईचा
बळी असेल तर?
तुम्हाला सावध रहायला हवं
हे तुम्हाला एवढ्यांसाठी सांगतो की,
तुमचाही एक चेहरा आहे तंतोतंत माझ्यासारखा
कवितेला वहीच्या खुराड्यात
बंद करणाऱ्या मालकासारखा
किंवा
एखाद्या संमेलनात
श्वासासाठी वही उघडण्यापुरता