Loading ...
/* Dont copy */

एक दृष्य - मराठी कविता

एक दृष्य, मराठी कविता - [Ek Drushya, Marathi Kavita] मी सिनेमागृहात प्रवेश करतो, समोरच्या पांढऱ्या पडद्यावर प्रकाश झोत पडतो.

मी सिनेमागृहात प्रवेश करतो, समोरच्या पांढऱ्या पडद्यावर प्रकाश झोत पडतो

मी सिनेमागृहात प्रवेश करतो
समोरच्या पांढऱ्या पडद्यावर प्रकाश झोत पडतो
आता नायकाची एन्ट्री वगैरे होईल या भ्रमात मी बेसावध
आणि अचानक हजारोंचा लोंढा
छाती फुटेस्तोवर सुसाट धावतानाचे दृश्य
पडद्यावरून परावर्तीत माझ्या शरीरावर
काय झालेय हे न कळताच लोकं
धावताहेत बेछूटपणे.
साऱ्या प्रेक्षकांच्या मेंदूचा ताबा घेतलाय धावत्या गर्दीने
सेक्स विषयी सजग असणारी ही माणसं
अशी नागडी का धावताहेत?
शहराच्या बिळांबिळातून धावताहेत लोकं
वाटेतील झाड छातीशी बांधून हातातलं कमावलेलं सर्व भिरकावून
काल जन्मलेलं मूल ही धावतंय सर्वशक्तीनिशी
धावण्याचा वेग किंचितही कमी होत नाही उल्टा वाढतोय रेटा दुप्पटीने
कोणाचीच कशी दमछाक होत नाहीये?
पडद्यावर तसुभरही जागा नाही
दुसऱ्या कुठल्याही स्थिरचित्रासाठी
कोणाचीच कशी दमछाक होत नाहीये?
यांन जायचंय कुठे?
या प्रश्नाची अधांतरी उत्तरे मेंदूत धक्काबुक्की करताना
हॉलमध्ये झुंबर पेटते आणि इंटरवल होतो
धपापणाऱ्या छातीत ही सर्व गर्दी कालवून मी सिनेमागृहाच्या बाहेर हेलपाटतो
बाहेरचा आश्वासक उजेड माझ्या पावलांना बळ देत राहतो


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची