Loading ...

भाषा व्यवहार - मराठी कविता

भाषा व्यवहार, मराठी कविता - [Bhasha Vyavahar, Marathi Kavita] मला भाषा जेवढी येते, तेवढा व्यवहार येत नाही.

मला भाषा जेवढी येते, तेवढा व्यवहार येत नाही

मला भाषा जेवढी येते
तेवढा व्यवहार येत नाही
म्हणून माझे उच्चार हीच असते माझी भाषा
उदाहरणार्थ मी नु क सा न शब्द बोलतो ‘नुस्कान’
काहीही खाक झाल्यानंतर.
गोविंदला अटक झाली काय किंवा गोपीनाथला
वळवळते माझी जीभ तीच असते माझी भाषा.
अटकेशी संबंध नसतो
गोविंद उर्फ गोपीनाथच्या.
भाषा संस्कार करते माझ्यावर
सहस्त्र आवर्तनासारखी
तिला चुकीची समजणारे आपण
कोण असतो, भाषेचे दलाल?
भाषा देते एक विश्वास
तेव्हा मी कोणत्यातरी चित्रपटाची
ऐकत असतो कथा बोबड्या बहिणीकडून
प्राण पाण्यात पडला...
भाषेला कुठे कळते चांगले वाईट
चांगले वाईट आपणच ठरवतो भाषेशिवाय.
मध्येच आली भाषेची जाहिरात
तर आपण जगतोय
मन मारून
इतकं समजण्यापुरतीच भाषा मला येते
आणि तेवढा व्यवहार येत नाही


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची