Loading ...

भेट - मराठी कविता

भेट, मराठी कविता - [Bhet, Marathi Kavita] आभाळ भरून आल्यानंतर, एकमेकांना भेटण्याचा संकेत अगदी अलीकडचा.

आभाळ भरून आल्यानंतर, एकमेकांना भेटण्याचा संकेत अगदी अलीकडचा

आभाळ भरून आल्यानंतर
एकमेकांना भेटण्याचा संकेत अगदी अलीकडचा
सर्व ऋतू खुडून तिच्या तळहातावर मी
नजरेतील व्याकूळ प्रार्थना ती मला नजराणा देते
संध्याकाळ मंद मंद चुळबुळत राहते
आकाशाभोवती
बागेतल्या बुटक्या गवतावरून
सरपटत राहतो
मनातला हिरवा साप
नुसत्या आभाळाकडे पाहून
पावसाचे अनुमान करता येत नाही
म्हणून तिच्या तळहातावरची आरास
मी विस्कटून टाकतो
ती आक्रोश करत राहते, मौनातून मौनात
इथल्या तांबूस संबंधातला पालापाचोळा
झटकत ती उठते आणि
शब्दांचा गजर बंद करून
चालू लागते प्रार्थनेकडे

आता
चर्चबेल अधिक जोरात
घणघणत राहते
माझ्या निरभ्र मेंदूत


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची