लाटेवरच्या सावल्या - मराठी कविता

लाटेवरच्या सावल्या, मराठी कविता - [Latevarchya Savalya, Marathi Kavita] अंश अंश हा असा माझा, क्षितिजाशी नाते म्हणतो.

अंश अंश हा असा माझा, क्षितिजाशी नाते म्हणतो

अंश अंश हा असा माझा
क्षितिजाशी नाते म्हणतो
पण मीच हा असा माझा
भ्रमराचा भवती फिरतो

दुर सावल्या गेल्या
त्या लाटेवरती साऱ्या
अन्‌, या काठावरती माझा
आभास शोधती फिरतो

संपत आले अंती
हे जीवनगाणे सारे
अन्‌, या जीवनगाण्यासाठी
संगीतशोधती फिरतो
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

1 टिप्पणी

  1. मराठी माती माझ्या मातीचे गायन सर्व पोस्ट मला आवडतात.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.