Loading ...
/* Dont copy */

काळजातून वाहणारा चेहरा - मराठी कविता (हर्षद खंदारे)

काळजातून वाहणारा चेहरा, मराठी कविता - [Kaljatun Vahnara Chehra, Marathi Kavita] घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी, अनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी.

घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी

घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी
अनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी

का कळेना सांग तुजला गुज माझ्या अंतरीचे
घे जरासा सोबतीला, प्राण ही गातोय गाणी

येवू दे काठावरी तू स्वप्न जे ओठांवरीचे
बिलगुनी लाटांस माझ्या काठ ही गातोय गाणी

लेवुनी जखमा सुगंधी स्वप्न सजले अंतःरीचे
श्वासन्या तुजला पुन्हा तो भास ही गातोय गाणी

तेच ते सांगु किती मी
जीर्ण या ओळींतूनी

या काळजातून वाहणारा चेहरा गातोय गाणी
घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी

अनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी
हर्षद खंदारे | Harshad Khandare
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची