इंद्राई किल्ला

इंद्राई किल्ला - [Indrai Fort] ४४९० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
इंद्राई किल्ला - Indrai Fort

इंद्राई किल्ला हे महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान

इंद्राई किल्ला - [Indrai Fort] ४४९० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात. राजधोर, कोळेधेर, इंद्राई, आणि चांदवड.

इंद्राई किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडाच्या पायऱ्या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलिकडेच डाव्या बाजूच्या कातळावर एक पारसीतील शिलालेख कोरलेला आहे. प्रवेशद्वाराचे अवशेष आजमितिस शिल्लक आहेत. गडमाथा प्रशस्त आहे. गडमाथावर गेल्यावर डावीकडे वळावे. थोडे पुढे गेल्यावर तीन वाटा लागतात. प्रथम उजवीकडची वाट पकडावी थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांगच रांग दिसते. या सर्व पाहून परत मागे फिरावे. नंतर वर जाणारी वाट पकडावी थोडे अंतर चढून गेल्यावर महादेवाचे दर्शन घेऊन परत मागे फिरावे आणि आता डावीकडे वाट पकडावी. थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहा लागतात. यापैकी काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत. शेवटच्या गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. इंद्राई किल्ल्यावरून चांदवड, राजधेर, कोळधेर, धोडप ईखारा हा सर्व परिसर दिसतो.

इंद्राई गडावर जाण्याच्या वाटा


वडबारे मार्गे: चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी. चांदवड पासून ६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वडबारे गावात उतरावे. वडबारे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक ठळक पायवाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जातांना एक झाप लागतो. ही वाट किल्ल्याच्या कातळकड्यापाशी राजधेरवाडीतून येणाऱ्या वाटेला येऊन मिळते. गावातून किल्ल्यावर पोहचण्यास ३ तास पुरतात.
राजधेरवाडी मार्गे: चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी आणि राजधेरवाडीत उतरावे. वडबारे गावाच्या पुढे राजधेरवाडी आहे. राजधेरवाडीतून सुद्धा किल्ल्यावर जाण्यास पायवाट आहे. ही वाट किल्ल्याच्या कातळकड्यापाशी वडबारे गावातून येणाऱ्या वाटेला येऊन मिळते. या वाटेने किल्ला गाठण्यास २ तास पुरतात. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. कड्यातूनच गडावर जाण्यासाठी एक पायऱ्याची वाट खोदलेलि आहे. सुमारे १५० पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला गडमाथा गाठता येतो.

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाणी टाके आहे. गडावर जाण्यासाठी वडबारे गावातून ३ तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.