Loading ...
/* Dont copy */

इरशाळगड किल्ला

इरशाळगड किल्ला - [Irshalgad Fort] इरशाळगड किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच इरशाळगडचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान.

इरशाळगड किल्ला - Irshalgad Fort

नेताजी पालकर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय होते यांचा जन्म इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक ह्या गावी झाला होता

इरशाळगड किल्ला - [Irshalgad Fort] ३७०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. इरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे. पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते.

इरशाळगड किल्ल्याचा इतिहास


तसे म्हटले तर या इरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे कारण इरशाळ हा एक सुळकाच आहे. त्यामुळे इतिहासातही त्याचा फार असा कुथे उल्लेख नाही. मे१६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. इरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटाना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारील मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.

इरशाळगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माची पासून गडावर जाताना वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत. तेथून पुढे सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडपाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगद हा परिसर दिसतो.

इरशाळवाडीत ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गडावर जेवणाची सोय नाही, स्वतःच जेवणाची सोय करावी लागते. मार्च पर्यंतच गडावरील टाक्यात पाणी असते इतर वेळी स्वतः पाण्याची सोय करावी लागते. जाण्यासाठी इरशाळवाडीतून एक तास लागतो.

सूचना: अतिकठीण (गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे) १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.




मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची