Loading ...
/* Dont copy */

हातगड किल्ला

हातगड किल्ला - [Hatgad Fort] ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील अजंठा सातमाळ डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

हातगड किल्ला - Hatgad Fort

सातमाळ रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगड

हातगड किल्ला - [Hatgad Fort] ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील अजंठा सातमाळ डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. सुरगणा नाशिक मधील एक तालुका. सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. या सातमाळ रांगेतील किल्ले म्हणजे जणू काय एक तटबंदीच. याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगड, या भागातील जनजीवन मात्र सामान्यच. थोड्या फार आधुनिक सुविधा इथपर्यंत देखील पोहचल्या आहेत.

हातगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात. पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लाग्ते. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत. या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत. या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगद्या सारख्या दरवाज्यातून आत शिरतो. या दरवाज्याला थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो. गडमाथा खूप विस्तीर्ण आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. दरवाज्यातून वर आल्यावर पायऱ्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते. येथे मोठ्या प्रमाणावर तटबंदी आहे. ती आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. समोरच एक पीर सुद्धा आहे.
उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे. पाण्याची एक टाके सुद्धा आहे. हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे. आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी. येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात. येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उतरल्यावर पाण्याचा तलाव सुद्धा आहे. यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे. तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे. किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे. तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते. वाटेत पाण्याची टाके लागतात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे. संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो. असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी. वर आहे. नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.

हातगड गडावर जाण्याच्या वाटा


हातगडवाडी मार्गे : हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे. नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे. येथून एक रस्ता सुरगण्याला जातो. तर दुसरा सापुताऱ्याला जातो. सापुताऱ्यला जाणाऱ्या रस्त्यावर बोरगावापासून ४ कि.मी. अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे. हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून एक डांबरी सडक कळवणला जाते या सडकेवरून पुढे जायचे. हातगडवाडी डाव्या हाताला ठेवयाची पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते. या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी सडक सोडायची आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरायची. या वाटेने १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या झाडाखाली पोहचतो. कागदावर जशी आपण तिरकी रेघ मारतो तशी या झाडापासून डोंगरच्या माथ्यापर्यंत तिरघी रेघ मारावी ही तिरकी रेघ गडावर जाणारी वाट पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो.

हातगड किल्ल्याचा नकाशा
हातगड किल्ल्याचा नकाशा


किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते.किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी हातगडवाडी मार्गे पाऊण तास लागतो.




मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची