सर्वांच्या नजरा एकवटलेल्या भुकेल्या नरभक्षकासारख्या माझ्यावर
सर्वांच्या नजरा एकवटलेल्या
भुकेल्या नरभक्षकासारख्या माझ्यावर
आणि मी अस्तित्व पणावर लावलेल्या
निर्भीड पण बावरलेल्या
निरागस हरणासारखा रानोमाळ
अखेरच्या क्षणापर्यंत
श्वासांच्या शर्यतीत जिंकण्याच्या
विलक्षण ध्यासाने पेटलेलो
मात्र मनाच्या खांद्यावर
श्वापदांच्या सुळ्यांचे ओघळणारे रक्तरंजीत पसायदान
नरडीचा घोट घेऊनदेखील
मुठीत आवळून धरलेली क्षितीज रेघ
आणि काहिशी संभ्रमात पडलेली माझी
अंधुक पण स्वच्छ नजर
विचारत होती
हे सर्व का? आणि कशासाठी?
हे सर्व का?
आणि कशासाठी?
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा