बहिरी किल्ला

बहिरी किल्ला - [Bahiri Fort] २७०० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे कर्जत जिल्ह्यातील कर्जत डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठिण समजला जातो.
बहिरी किल्ला - Bahiri Fort

ढाकचा बहिरी म्हणजे ‘ढाकचा किल्ला’ आणि ‘गडदचा बहिरी’ ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणाऱ्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असेही म्हणतात.

बहिरी किल्ला - [Bahiri Fort] २७०० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे कर्जत जिल्ह्यातील कर्जत डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठिण समजला जातो. लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाची किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमी येत असतात.

मात्र याच राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. या किल्ल्याची आपल्या सारख्या रानावनात हिडणाऱ्या मंडळीना ओळख करून दिली ती म्हणजे ‘गो. नी. दांडेकर’ यांनी.

ढाकचा बहिरी म्हणजे ‘ढाकचा किल्ला’ आणि ‘गडदचा बहिरी’ ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणाऱ्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असेही म्हणतात. विशेषतः ढाकच्या किल्ल्याअर पोहचायचे असल्यास ‘वदप’ गाव गाठावे. किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची दोन, तीन टाकी आणि एकमंदिर आहे. मंदिरात ४ जणांना झोपता येते. या किल्ल्याच्याच नैसर्गिक तटबंदीच्या कातळात ‘गडदचा बहिरी’ लपून बसला आहे. याच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे.

बहिरी किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


बहिरीची गुहा: बहिरीच्या गुहेतच पाण्याचे एक मोठे टाके आहे. टाक्यांमध्येच गावकऱ्यांनी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वरच दीड हजार फुटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथून्च नागफणीचे टोक, प्रबळगड, कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो.

बहिरी गडावर जाण्याच्या वाटा


गडदचा बहिरीवर अर्थात ढाकच्या गुहेपर्यंत जाणाऱ्या सर्व वाटा ‘कलकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधूनच जातात.

येथील राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गुहेतच पिण्याच्या पाण्याचे एक मोठे टाके आहे. वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा भरपूर साठा असणे आवश्यक आहे. गडावर जाण्यासाठी सांडशी मार्गे ४ तास लागतात.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.