माणिकगड किल्ला

माणिकगड किल्ला - [Manikgad Fort] २५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
माणिकगड किल्ला - Manikgad Fort

प्रबळगड, इरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगड

माणिकगड किल्ला - [Manikgad Fort] २५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

मुंबई पुणे हमरस्त्यावरून जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड, इरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगड. कर्नाळा, सांकशी, माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ. माणिकगडाच्या आजुबाजूचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ल्यातप्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधून आत शिरल्यावर समोरच देऊल दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात. कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात.

येथून डावीकडे फुटणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात यात मेंपर्यंत पाणी असते. टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे पुढे गेल्यावर दोन चांगले बांधलेले बुरुज आढळतात. येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरुवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो. किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.


गडावर जाण्याच्या वाटा


पनवेल किंवा खोपोली मार्गे: यायचे झाल्यास आपटे फाट्यामार्गे रसायनीकडे वळावे. रसायनीमधून वाशिवली गावात यावे. वाशिवली गावातून वडगाव गावात यावे. वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पनवेलहून वडगाव पर्यंत येण्यास दीड तास पुरतो. वडगाव हे बऱ्यापैकी मोठे गाव आहे. माणिकगडाची एक सोंड गावातच उतरलेली आहे. या सोडेच्या साह्याने समोरच्या डोंगरधारेवा चढत जावे.

वडगाव पासून डोंगराच्या माथ्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो या डोंगराच्या माथ्यावर कातरवाडी वसलेली आहे. या वाडीतून समोरच दिसतो. गडाच्या दिशेने चालत निघायावर अर्ध्यातासातच आपण एका जंगलात शिरतो. येथून पुढे जाण्यासाठी दोन वाटा फुटतात.

माणिकची लिंगी मार्गे: उजवीकडे जाणारी वाटा प्रशस्त आणि मळलेली आहे. या वाटेने जातांना गड डावीकडे ठेवून आपण पुढे जातो. वाट जंगलातून पुढे गेलेली आहे. सुमारे अर्ध्या तासाने आपण गडाच्या पश्चिम टोकावर पोहचतो येथेच गडाला चिटकून एक सुळका आहे. यालाच ‘माणिकची लिंगी’ म्हणतात. येथून एक वाट सरळ पुढे पठारावर गेलेली आहे तर दुसरी वाट डावीकडे जंगलात वर चढत गेलेली आहे.

ही वाट किल्ला आणि सुळका यांच्या बेचक्यातून वर जात. हीच वाट आपण पकडायची. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक घळ लागते. या घळीतून वर चढून जायचे पण वाट जरा दमछाक करणाई आहे. या वाटेने किल्ल्यावर पोहचण्यास एक तास लागतो.

खिंडीतून: उजवीकडच्या वाटेचा नाद सोडून द्यायचा आणि समोर असणाऱ्या झाडीत शिरायचे. या वाटेने आपण समोरची डोंगरसोंडा चढत जातो. पुढे दोन उंचवटे पार केले की आपण एका खिंडीत पोहचतो येथेच एक छोटासा सुळका आहे.

सुळका आणि डोंगर यांच्या खिंडीतून वर चढले की आपण पुन्हा एका घळीत पोहचतो या घळीतून सोपे प्रस्तरारोहण करून वर चढले की आपण एका पठारावर येऊन पोहचतो आणि या पठारावर क्र. १ ची वाट आपल्या येऊनमिळते. या दोन्ही वाटा एकत्र येऊन पुढे एक वाट तयार होते. आणि आपण किल्ल्यात प्रवेश करतो.

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते.किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे पिण्याच्या पाण्याचा काही अडचण नाही. गडावर जाण्यासाठी वडगावमार्गे ३ तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.