Maharashtra | महाराष्ट्र

भुतकाळ आणि वर्तमान

Maharashtra Past and Present

महाराष्ट्र(Maharashtra State,India)

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजनकाचनकरवंदीच्या काटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळंदारी देशा ॥
भावभक्तिच्या देशा आणिक बुध्दीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी
निशाणावती नाचतें करी ॥
जोडीइहपरलोकांसी व्यवहारा परमार्थासी ॥
वैभवासि वैराग्यासी ॥

- राम गणेश गडकरी

आपला प्रदेश

भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे.

विहंगालोकन

महाराष्ट्र ही मराठी बोलीभाषा असणाऱ्या लोकांची भूमी आहे. महाराष्ट्र हे नाव `महाराष्टी' या प्राकृतच्या जुन्या प्रकारच्या नांवावरून पडले असावे.

पुरातनकाल

प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्रात मानवी वस्ती झाली नाही असे पूर्वी समजले जात असे. परंतु हल्लीच्या संशोधनाद्वारे येथे अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व होते ते सिद्ध केलेले आहे.

मोहोलेशे ते महाराष्ट्र

ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता, आणि लोकांचे स्वभावविशेष यामुळे तो प्रभावित झाला होता.

अर्थव्यवस्था आणि उद्योग

एका प्रदीर्घ आणि अपूर्व लढ्यानंतर १९६० सालच्या मे महिन्यात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि मराठी जनतेने उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात आले. साहजिकच यानंतर सर्वांगीण प्रगतीचा कालखंड सुरू होईल अशी मराठी लोकांची अपेक्षा होती.

सहकारी चळवळ

सहकारी विकासाच्या बाबतीत भारतीय राज्यात महाराष्ट्र बहुतेक सर्वात अग्रेसर आहे. भारतीय सहकारी चळवळीमध्ये गुंतलेल्या खेळत्या भांडवलाचा १/६ भाग महाराष्ट्रातील सहकारी प्रयत्नात गुंतला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान

स्वतंत्र भारताचा जन्म अणु युगाच्या सुरुवातीच्या काळात झाला. त्याच्या सुदैवाने जवाहरलाल नेहरू यांच्या सारखे द्रष्टे पुढारी मार्गदर्शन करण्यास सज्ज होते.

शिक्षण

छत्रपती शाहु महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणाच्या प्रसाराने मने संस्कारित झाली म्हणजे जातिभेद नष्ट होईल या भावनेने त्यांनी सार्वजनिक शिक्षणाची मोहीम कोल्हापूर संस्थानात सुरू केली.

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.