विहंगावलोकन - महाराष्ट्र

विहंगावलोकन, महाराष्ट्र - [Vihangavlokan, Maharashtra] महाराष्ट्र ही मराठी बोलीभाषा असणाऱ्या लोकांची भूमी आहे.

महाराष्ट्र ही मराठी बोलीभाषा असणाऱ्या लोकांची भूमी आहे

महाराष्ट्र ही मराठी बोलीभाषा असणाऱ्या लोकांची भूमी आहे. महाराष्ट्र हे नाव ‘महाराष्टी’ या प्राकृतच्या जुन्या प्रकारच्या नांवावरून पडले असावे. मात्र काही लोकांचे असेदेखील म्हणणे आहे की मुळात या भागात महार आणि रट्ट या लोकांची वस्ती होती. या दोन नांवावरून ‘महारट्ट’ व नंतर महाराष्ट्र’ असे नांव या भूमीला पडले. इतर काहींच्या मतानुसार महाराष्ट्रभूमी दंडकारण्याप्रमाणेच वनभूमी होती व तिला ‘महाकांतार’ म्हणत; त्याचा अपभ्रंश म्हणजेच ‘महाराष्ट्र’ होय.

संस्कृत शिलालेखात महाराष्ट्रातील विदर्भ, अपरांत (कोकण) इत्यादी काही भागांचा उल्लेख आढळतो. वेदांत उल्लेखिलेल्या दक्षिणपाद या प्रदेशाचे ते भाग असावेत असा निष्कर्ष काढता येतो. मात्र असे ऐतिहासिक उल्लेख तुरळक प्रमाणात असून त्यांची संगती लावणे पुष्कळ वेळा कठिण जाते. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणाऱ्या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली. वरील मध्यवर्ती सत्ताकेंद्रांशिवाय करवीरचे शिलाहार, अपरांतचे भोज व गोव्याचे कदंब ही मांडलिक घराणी सीमेलगतच्या प्रदेशात उदयास आली. मात्र या प्रदेशात खरा एकजिनसीपणा आला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या हिंदवी राष्ट्रवादामुळेच. शिवाजी महाराजांना गुरुस्थानी असलेल्या समर्थांनीच ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म जागवावा ॥ अशी शिकवण देऊन या कामी मोलाचा हातभार लावला. पेशव्यांच्या काळात राजकीय चढ-उतारांबरोबर राज्याच्या सीमा आकुंचन पावत अगर विस्तारत. त्या काळच्या मराठी राज्याने व्यापलेला प्रदेश साधारणत: गोवा , दमण, आणि गोंदिया या तीन ठिकाणांनी केलेल्या त्रिकोणाने बंदिस्त झाला आहे.

सध्याच्या स्वरुपातील मराठी भाषिक राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. भाषावर प्रांतरचना १९५६ साली अमलात येऊनही मुंबईच्या नाजूक प्रश्नामुळे महाराष्ट्र व गुराजत यांचे द्वौभाषिक निर्माण करण्यात आले होते. जनतेने मात्र या गोष्टीला तीव्र नापसंती दर्शविली आणि त्यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उदयास आली. परिणामत: सध्याचे मराठी भाषिक राज्य अस्तित्वात आले. या राज्यात सलग मराठी भाषिक प्रदेश एका छत्राखाली आणण्यात आले आहेत. यात मुख्यतः ब्रिटिशांच्या काळात मुंबई इलाख्यात असलेल्या महाराष्ट्राचा भाग, हैद्राबादच्या निजाम संस्थानातील वायव्येकडील पाच जिल्हे व मध्य प्रांतातील दक्षिणेकडील आठ जिल्हे एकत्र आणण्यात आले आहेत. वरील तीन भागात पूर्वी अस्तित्वात असलेली अनेक छोटी संस्थाने देखील होती. काही संस्थानांचे शेजारच्या जिल्ह्यात विलिनीकरण करण्यात आले. कोल्हापूर, सातार, सांगली यासारख्या काहींचे स्वतंत्र जिल्हे निर्माण करण्यात आले. राज्याचे. क्षेत्र राज्याचे क्षेत्र सुमारे ३.०८ लाख चौ.कि.मी. आहे.

[next]

प्राकृतिक स्वरूप


भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावर मध्यभागी वसलेल्या आणि मुंबईसारख्या बंदराच्या मदतीने अरबी समुद्रावर अंमल ठेवू पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या एकात्मतेत भर पडते ती त्याच्या भूसंरचनेमुळे. राज्याचे पठारी स्वरूप सहजपणे मनावर ठसते. पठाराची पश्चिम कडा डोंगराळ असुन तिलाच आपन सह्याद्री म्हणतो. पठाराची उंची पश्चिम भागात ६०० मी. असून ते पूर्वेला व आग्नेयेकडे उतरत गेले आहे. पूर्वेकडील सीमाभागात त्याची उंची सुमारे ३००मी. आहे. पठारावर उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या व त्यांच्या मुख्य उपनद्या यानी खननकार्य करुन दऱ्या निर्माण केल्या आहेत. दोआब क्षेत्रात झीज त्यामानाने कमी झाल्यामुळे व मूळ खडकांच्या क्षितिजसमांतर संरचमुळे तेथे पठारी प्रदेश निर्माण झाले आहेत. अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ यासारखी पठारे अशाच प्रकारची आहेत. सह्याद्री महाराष्ट्राचा कणा मानला जातो. कोकणातून पाहिल्यास पायथ्यापासून अनेक कड्याच्या साहाय्याने तो भराभर उंचावत जातो व १००० मीटरहून अधिक उंची गाठतो. त्यामुळेच या बाजूकडून पाहिल्यास त्याचे पर्वतीत स्वरूप चटकन्‌ अनुभवास येते. पूर्वेकडे त्याची उंची क्रमक्रमाने, पायऱ्या-पायऱ्यांनी कमी होते व मावळ भागातून पुढे जात तो पठाराच्या पातळीवर येतो.

सह्याद्री व अरबी समुद्र यांच्यात सुमारे ५० किमी. रुंदी असणारा सखल पट्टा म्हणजेच कोकण. अनेक छोट्या मोठ्या नद्यांनी खणलेल्या खोल दऱ्यांमुळे हा भाग छिन्नविछिन्न झाला असून त्यात जांभ्या दगडाच्य कातळाने आच्छादिलेली सखल पठारे, टेकड्या आणि पूर्व क्षितिजावर सह्याद्रीची भिंत असे विविध भूआकार आढळतात.

उत्तर सीमेवरील सातपुड्याचा काही भाग आणि पूर्व सीमेवर भामरागड-चिरोली-गायखुरी रांगामुळे राज्याच्या त्या सीमादेखील प्राकृतिक स्वरुपाच्या असून त्यामुळे सीमेपलीकडील राज्यांशी दळणवळण आणि संपर्क ठेवण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

राज्याच्या जडणघडणीवर भूसंरचनेचा खुपच परिणम झाल्याने जाणवते. राज्याचा पूर्व वऱ्हाडाचा व दक्षिणेकडील कोल्हापूर-सिंधुदुर्गचा काही भाग सोडल्यास राज्याचे इतर क्षेत्र दख्खन लाव्हा क्षेत्रात मोडते. सुमारे सहा ते नऊ कोटी वर्षांपूर्वी भेगांतून बाहेर पडलेल्या लाव्हारसामुळे आच्छादिल्या गेलेल्या महाराष्ट्र भूमीत बहुतेक सर्वत्र क्षितिजसमांतर अवस्थेत असणारे बेसॉल्ट खडक आधळतात. अर्थात सर्व भागात बेसॉल्ट एकाच प्रकारचा नाही. काही भागात खडक स्फटिकरहित व पोलादी करड्या रंगाचे असून त्यात लाव्हा थंड होताना निर्माण झालेल्या उभ्या फटी आढळतात. या फटींतून खडकांची झीज सुलभपणे होऊन त्यामुळे उभट कडे निर्माण झाले आहेत. दोन लाव्हा थरांमध्ये मात्र ज्वालामुखी राखेचे आणि विवरयुक्त बेसॉल्टचे थर आढळतात. उष्ण-दमट प्रकारच्या हवामानातील अनाच्छादनाच्या क्रियेमुळे भूस्वरूपात आणखी बदल घडून येतात. विशेषतः पश्चिम भागातील अतिपावसामुळे व पुर्वेकडील कोरड्या हवामानामुळे भूरूपात डोळ्यात सहज भरण्याइतपत फरक जाणवतो. कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी-पूर्णा आणि वर्धा-वैनगंगा यानी केलेल्या क्षरण कार्यामुळे रूंद दऱ्या निर्माण झाल्या आहेत. याउलट कोकणातून वाहणाऱ्या जेमतेम १०० किमी लांबीच्या अवखळ ओढ्यानी तयार केलेल्या दऱ्या अरूंद व खोल असून त्यातून पाणी जोराने खळखळाट करीत खाली येते. मुखाजवळ मात्र काहीशी सपाटी आढळते. भरतीच्या वेळी पाणी वर शिरत असल्यामुळे खाड्या निर्माण झाल्या आहेत.

[next]

हवामान


राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरूअ होणाऱ्या कडक, भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याचे पर्यवसान शेवटी पावसाळ्यात होते. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली आनंददायी हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस अतिशय जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागाला मुसळधार पावसाचे देणे लाभले आहे. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पुर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतुच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

[next]

साधनसंपत्ती


राज्याचे जेमतेम १७% क्षेत्र जंगले म्हणून वर्ग करता येते. पठाराचा बहुतेक अंतर्भाग विरळ, खुरट्या काटेरी झुडपांनी आच्छादिलेला आहे. जर इतिहासकाळात महाराष्ट्राची गणना ‘महा-कांतार’ म्हणून करण्यात आली असेल तर आज जंगलांच्या बाबतीत बरीच पीछेहाट झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

महाराष्ट्रातील मृदा बहुतेक भागात स्थानिक खडकांपासून तयार झालेल्या आहेत. मात्र मृदानिर्मितीवर हवामानाचा प्रभावदेखील जाणवतो. बेसॉल्ट हा बहुतेक भागात तळ खडक असल्यामुळे कोरड्या पठारावर काळी माती अथवा रेगूर प्रामुख्याने आढळते. तिचा पोत बारीक असून त्यात लोहाचे प्रमाण बरेच आढळते. मात्र नत्र व सेंद्रीय द्रव्ये त्यात कमी असल्यामुळे नत्रयुक्त व सेंद्रीय खते यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. उंच पठारी भागात अतिशय रेताड अशी पठारी मृदा आढळते. कोकण आणि सह्याद्री भागात विटकरी रंगाची जांभ्या दगडाची मृदा आढळते. ही मृदा जंगलव्याप्त प्रदेशांत काहीशी सुपीक असते. मात्र जंगलतोड केल्यास त्याच भागात नापीक ‘वरकस’ मृदेची निर्मिती होते. सर्वसाधारपणे महाराष्ट्रातील मृदांचे थर पातळ असून त्याना खतांची भरपूर प्रमाणात आवश्यकता असते.

राज्यांच्या नैसर्गिक संपत्तिसाधनांमध्ये पाणी हे अत्यंत मौल्यवान साधन आहे. त्यालामागणी मोठी आहे. मात्र स्थलपरत्वे त्याचे वितरण अत्यंत विषम आहे. भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकण भागात देखील अनेक खेडेगावात लोकांना, विशेषतः उन्हाळ्यात, पाण्यासाठी अश्रू ढाळावे लागतात. लागवडीखालील क्षेत्रापैकी जेमतेम ११% भागाला जलसिंचनाचा फायदा मिळतो. सिंचनासाठी वापरात आणलेल्या पाण्यापैकी सुमारे ५५% पाणी विहिरीतून उपलब्ध होऊ शकते. तापी-पूर्णा खोऱ्यात अनेक नलिकाकूप तर किनारी भागात अनेक उथळ विहिरी खोदल्या गेल्या असून त्यापासून पाणीपुरवठा होतो. विद्युत पंपांची सोय उपलब्ध झाल्यानंतर मात्र उपशाचे प्रमाण एकदम वाढल्यामुळे विहिरींचे पाणी मचूळ अथवा खारे होण्याचे प्रकार घडत आहेत.

महाराष्ट्रात खनिज पट्टे बेसॉल्ट पठाराच्या सीमेपलीकडे म्हणजेच पूर्व विदर्भ, दक्षिण कोल्हापूर व सिंधुदुर्ग या प्रदेशात आढळतात. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि नागपूर जिल्हयातून राज्याचा प्रमुख खनिज पट्टा जात असून त्यात कोळसा आणि मॅंगनीज ही मुख्य खनिजे आढळतात. लोहखनिज व चुनखडी ही या भागातील खनिज-संपत्ती अजून बरीचशी सुप्तावस्थेत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागातील वाळूत इल्मेनाईट या खनिजाचे साठे आढळतात.

ऊर्जा-निर्मिती आणि ऊर्जेचा वापर यांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याची गणना विकसित राज्यांत होते. एकूण ऊर्जेपैकी ५५% औष्णिक उर्जा, ३५‍% जलविद्युत आणि ६% अणुऊर्जेच्या स्वरूपात उत्पन्न केली जाते. तारपूर या महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेलगत वसविलेल्या अणुऊर्जा केंद्रातील ऊर्जा दोन्ही राज्यात समसमान वाटून घेण्यात येते. पूर्वेकडील डोंगराल भागातील इंद्रावती व वैनगंगा यासारख्या खोऱ्यात जलविद्युत शक्ति निर्माण होण्यासाठी अनेक योग्य जागा उपलब्ध आहेत.

इतर साधनसंपत्तीमध्ये पशुसंपत्ती जरी संख्याबलाने खूप असली तरी तिची काळजी योग्य प्रमाणात घेतली जात नाही. मात्र सहकारी तत्त्वावर दुग्धोत्पादन आणि शहरांच्या आसपासच्या भागात कुक्कुटपालन यांचा विकास होत आहे. ठराविक काळापुरता मर्यादित असूनही राज्यात सागरी मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. त्यासाठी देखील मुंबई शहर हीच मुख्य बाजारपेठ आहे. किनाऱ्यालगत असलेल्या उथळ सागरतळामुळे ट्रॉलर्सच्या साहाय्याने वर्षभर सागरी मासेमारी करणे सहज शक्य आहे.

[next]

अर्थव्यवस्था


शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. बुद्धिमत्ता व योजकता यांच्या सहाय्याने बेताच्या जाडीचा मृदेचा थर आणि पावसाची अनिश्चितता यासारख्या संकटावर मिळवलेला विजय या शब्दातच महाराष्ट्रातील शेतीच्या यशाचे यर्थार्थ वर्णन करता येईल.

देशावरच्या शेतीमध्ये काही ठळक वैशिष्ट्ये आढळतात ती अशी : धरपाण्याची कोरडवाहू शेती, दुर्मिळतेमुळे पाण्याचा मोजका व काळजीपूर्वक वापर, अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया व कापूस यांची मिश्रशेती, तांदूळ आणि गहू यांचे अल्प प्रमाण, नगदी पिकांवर भर आणि ऋतुमानानुसार आढळणारे बदल.

खूप पाऊस पडूनही कोकण भाग मात्र बव्हंशी एकपिकी राहिला असून तेथे तांदूळ हे मुख्य पीक आहे. जमीन सपाट नसल्याने उतारावर बांध घालून प्रथम लागवडयोग्य सपाट जमीन निर्माण करणे आवश्यक ठरते. तांदळाच्या जोडीला किनारी भागात नारळ, थोडेसे आतल्या बाजूला सुपारी व वरकस उतारावर आंबे, काजू यांची बागायत आढळते. उत्तर भागात मात्र मुंबईच्या बाजारपेठेचा विशेष प्रभाव जाणवतो. वाहतूक व्यवस्था सोयीस्कर असल्याचा फायदा उठवून शेतकऱ्यांनी शेतीव्यवसायाचा कायापालट घडवून आणला आहे. तलावापासून जलसिंचन उपलब्ध होणारा वैनगंगा नदीच्या खोऱ्याचा भाग दुपीक असून लागवडाखालील सुमारे ४०% भागात रब्बी पीक काढले जाते.

कापसातील सरकी काढणे. धान्य व डाळी दळून त्यांचे पीठ तयार करणे आणि घाण्यांच्या मदतीने तेलबियांपासून तेल करणे यासारखे छोटे उद्योग सोडले तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उद्योगधंदे नाहीत असे म्हटल्यास वावगे होणार नाही. साखरधंद्यात संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने सहकारी तत्वावर अनेक साखर कारखाने उभारून पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची भरभराट केली आहे. ही कारखानदारी सोडल्यास मात्र औद्योगीकरण मोठ्या शहरातच केंद्रित झाल्याने आढळते. औद्योगिक उत्पादन, त्याचे मूल्य व त्यात गुंतलेले लोक यात एकट्या महामुंबईचा वाटाच जवळजवळ ४०% इतका मोठा आहे. यंत्रौत्पादने, रसायने, औषधे आणि रोजच्या व्यवहारातील उपभोग्य वस्तू यांचा औद्योगिक उत्पादनात महत्वाचा वाटा आहे. राज्य उद्योगधंद्याच्या द्रुष्टीने प्रगतिपथावर असले तरी त्यातील जवळजवळ निम्मे जिल्हे औद्योगिक दृष्ट्या मागासलेले आहेत हे कटू सत्य आहे.

एकंदरीत महाराष्ट्र राज्य आर्थिक दृष्ट्या प्रगत व गतिशील आहे. १९८० च्या किंमती विचारात घेता राज्याचे दर डोई उत्पन्न २००० रु. आहे. एकंदर राष्ट्राच्या दर डोई उत्पान्नाच्या (१३०० रु.) मानाने ते खूपच अधिक आहे. आर्थिक दृष्ट्या राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो.

[next]

लोकजीवन


१९८१ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ६२७ लाख असून लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येची दाटी चौ. किमीला २०४ इतकी असून सबंध देशाचा विचार करता ती काहीशी कमी आहे. नागरीभवनाच्या दृष्टीने राज्य पहिल्या क्रमांकावर असून त्यातील ३५% लोक शहरात राहतात; मात्र यापैकी ४०% लोक एकट्या मुंबईत राहतात. राज्यात दशलक्षावर लोकसंख्या असलेली मुंबई, पुणे व नागपूर ही तीन महानगरे असून त्यांच्या लोकसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. मध्यम लोकसंख्येवर शहरांची त्यामानाने बेताने वाढ होत असून छोट्या शहरांची वाढ जवळजवळ खुंटलीच आहे. काही तर रोडावत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील नागरीभवनाच्या प्रक्रियेला अत्यंत अनिष्ट वळण लागले असून त्यात संतूलन निर्माण करण्यासाठी मध्यम व छोट्या शहरांची वाढ प्रयत्नपूर्वक घडवून आणणे आवश्यक आहे.

कामगार वर्गापैकी जवळजवळ तीन-चतुर्थांश लोक शेतीव्यवसायात गुंतलेले आहेत. त्यातदेखील राज्यात शेतमजुरांचे प्रमाण बरेच मोठे आहे. इतकेच असूनही शेती उत्पादनांपासून निघणारे उत्पन्न राज्यातील एकूण उत्पान्नाच्या फक्त ४३% च आहे. उलट उद्योगधंद्यात केवळ १६% लोक गुंतले असूनही त्यापासून ३८% उत्पन्न मिळते.

राज्यातील २०% हून थोडेसे अधिक लोक अनुसूचित जाती व जमातींचे आहेत. पूर्व विदर्भ टेकड्या (गोंड), मेलाघाट (कोरकू), सातपुड्याच्या पायथ्याजवळील खानदेश (भिल्ल) आणि सह्याद्रीचा उत्तर भाग ( वारली व कातकरी ) हे प्रमुख आदिवासी प्रदेश आहेत. लोक प्रामुख्याने हिंदू असले तरी अल्पसंख्यांक जमातीदेखील पुष्कळ आहेत; त्या विशेषत: शहरात आढळतात.

ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरा प्रादेशिक अस्मिता निर्माण करण्यास पोषक ठरतात. फार प्राचीन काळापासून सह्याद्रीच्या भिंतीमुळे महाराष्ट्राच्या इतर भागापासून अलग झालेला कोकणचा किनारी भाग समुद्राकडेच आकर्षित झालेला असून सागरी व्यापारसंबंध प्रस्थापित करण्यात, ठाणे, चौल, बायझांटियस (विजयदुर्ग) आणि इतर बंदरे झपाट्याने पुढे आली आणि तशीच काळाच्या ओघात त्यांच्या प्रगतीला ओहोटीही लागली. सोपारा-कल्याण-जुन्नर-पैठण यासारख्या अरुंद आणि दुर्गम खिंडीतून जाणाऱ्या व्यापारी मार्गांनी किनारी आणि अंतर्गत भाग जोडले गेले होते. उत्तर कोकणचा भाग गुजरात आणि उत्तर हिंदुस्थान यांचे प्रवेशद्वार होते. येथे गाव हे वाड्या किंवा पाड्या एकत्र येऊन बनलेले असते पुष्कळदा वाड्यातील वस्ती, व्यवसाय, जात, धर्म यानुसार एकत्र आलेली असते आणि वाड्या डोंगरापायथ्याशी वसलेल्या असतात. वाड्यातही घरे एकत्र असतातच असे नाही. कित्येकदा घरे सुटी असून आजूबाजूला आंबा, फणस यासारख्या फळझाडांचे परसू असते. त्यांचा काहीसा एकलकोंडेपणा आणि अपुरी अंतर्गत वाहतुक यामध्येच त्यांचे बरेचसे प्रश्न सामावले आहेत.

पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेने, उत्तरेला विंध्यासातपुडा या दोन डोंगर रांगानी व पूर्वेला बस्तरच्या डोंगराळ प्रदेशाने बंदिस्त झालेला देश भाग आग्नेयेच्या बाजूने खुला असल्यामुळे उत्तरेपेक्षा दक्षिणेकडून होणारा सांस्कृतिक प्रभाव अधिक होता. त्यामुळेच तिकडील संस्कृती व देशावरील संस्कृती यांचा मिलाफ झालेला आढळतो. खांडवा-बऱ्हाणपूर खिंडीतून उत्तर हिंदुस्तान जोडले असल्यामुळे त्यातूनच उत्तरेकडून व्यापार‌उदीम आणि लष्करी मोहिमा देशावरील दऱ्या-खोऱ्यात येऊन पोचल्या. देश हा पाणवठ्याभोवती वसलेल्या गांवांचा प्रदेश आहे. या गावांचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी भिंती आणि धाब्याच्या छपरांची घरे हे होय. यातील मोठी गावे शेतीमालाच्या बाजारपेठेची ठिकाणे म्हणून विकसित झाली आहेत. पठाराच्या शुष्क आणि अवर्षणप्रवण तसेच दुष्काळग्रस्त मध्य भागात धनगर व पशुपालन करणाऱ्या इतर जमाती राहतात.

सह्याद्री हा राज्याचा प्राकृतिक कणा व आर्थिक विभाजक आहे. मराठी राज्य भरभराटीच्या शिखरावर असताना डोंगरभाग विशेषत्वाने नांवारूपाला आला. डोंगर सोडांच्या उभ्या कडा व त्यांच्या टोकांवर असलेले डोंगरी किल्ले यामुळे या भागांच्या शृंगारात भर पडली. जंगलसंपत्ती, वन्य-प्राणीजीवन आणि त्यांच्याशी निगडित असलेले आदिवासी जीवन हळूहळू लुप्त पावत असून सह्याद्रीची दुर्गमताही कमी होत आहे. थंड हवेची ठिकाणे, तसेच डोंगरी किल्ले यामुळे सह्याद्रीचे आकर्षण वाढत आहे. जलविद्युत-निर्मितीसाठी योग्य जागा व घाटातून जाणारे रस्ते आणि लोहमार्ग यांनी तयार झालेले वाहतूक पट्टे यामुळे देखील आर्थिक द्रुष्टीने हा भाग अधिक आकर्षक बनत आहे. सह्याद्रीच्या पूर्वेला मावळ भागातील जंगलांच्या कडेला वसलेल्या गावांमुळेच मराठ्यांच्या सैन्याला बळ प्राप्त झाले. या भागातील जीवन खडतर पण रांगडे आहे.

[next]

सांकृतिक एकता


वरील सर्व प्रादेशिक भेद असूनही महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन सांस्कृतिक आणि भाषिक एकजिनसीपणामुळे बांधले गेले आहे. समाजव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक मूल्ये यामध्ये याचा प्रत्यय येतो. सर्व महाराष्ट्रभर हिंदूची देवस्थाने एकतर नद्यांच्या काठी किंवा डोंगरमाथ्यावर वसली आहेत. नाशिक, नरसोबाची वाडी, आळंदी, पैठण, पंढरपूर इत्यादी पहिल्या प्रकारात मोडतात; तर जेजुरी, रामटेक दुसऱ्या प्रकारात मोडतात. अष्टविनायकांची ठिकाणे, ज्योतिर्लिंगे, कोल्हापूरची अंबाबाई, पंढरपूरचा विठोबा आणि तुळजापूरची भवानीदेवी यांचे प्रभावक्षेत्र खूप मोठे असून त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचा कोनाकोपाऱ्यातून लोक जातात. वारकरी संप्रदायाने एकात्मतेत मोलाची भर घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकात जवळीक निर्माण झाली आहे.

या तसेच इतर धार्मिक ठिकाणी होणाऱ्या जत्रा म्हणजे आर्थिक-सामाजिक अभिसरणासाठी निर्माण झालेली केंद्रे होत. त्यामुळेच सर्व विषमतेवर एकतेचा ठसा उमटल्याचे जाणवते.

[next]

भारतात महाराष्ट्राचे स्थान


आकारमान व लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तृतीय क्रमांक लागतो. अनेक आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. सहकारी कृषीक्षेत्रात महाराष्ट्राने मिळविलेले यश बहुधा अनन्यसाधारणच म्हणावे लागेल. औद्योगिक क्षेत्रातील कित्येक बाबतीत महाराष्ट्र खूपच आघाडीवर आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही समर्थ नेतृत्व निर्माण करण्यात हे राज्य नेहमीच आघाडीवर राहिले आहे. भारताचे आर्थिक मर्मस्थान महाराष्ट्रातच आहे. मुंबईच्या नाडीचे पडसाद सबंध देशभर उमटतात.

- बी. अरुणाचलाम्‌


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

ब्लॉगर
नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,351,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,180,आईच्या कविता,11,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,405,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,3,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,12,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरती संग्रह,1,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इंद्रजीत नाझरे,2,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,10,उमेश कुंभार,10,ऋचा मुळे,1,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,35,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,7,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,30,कोशिंबीर सलाड रायते,3,कौशल इनामदार,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,17,घरचा वैद्य,2,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,163,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,1,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,388,दिनविशेष,366,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,2,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,17,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पाककला,118,पावसाच्या कविता,7,पी के देवी,1,पुडिंग,8,पुणे,5,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,6,पौष्टिक पदार्थ,9,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,24,प्रेरणादायी कविता,5,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,7,बातम्या,2,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बेकिंग,3,भाग्यवेध,8,भाज्या,15,भाताचे प्रकार,8,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,13,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,31,मराठी कविता,122,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,21,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,1,मराठी भयकथा,30,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,18,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,295,मसाले,3,महाराष्ट्र,55,महाराष्ट्र फोटो,5,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,11,मांसाहारी पदार्थ,10,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,7,मार्च,31,मुंबई,7,मुलांची नावे,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशवंत दंडगव्हाळ,6,यादव सिंगनजुडे,1,राजकीय कविता,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,11,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,1,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,5,विचारधन,211,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,17,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,48,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,8,व्हिडिओ,17,शांततेच्या कविता,2,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,2,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,5,संजय पाटील,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत तुकाराम,6,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,7,संस्कृती,14,सचिन पोटे,2,सण-उत्सव,8,सणासुदीचे पदार्थ,9,सनी आडेकर,9,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,16,सायली कुलकर्णी,3,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,4,स्त्रोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,1,स्वाती खंदारे,117,स्वाती दळवी,2,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,16,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,होळी,5,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: विहंगावलोकन - महाराष्ट्र
विहंगावलोकन - महाराष्ट्र
विहंगावलोकन, महाराष्ट्र - [Vihangavlokan, Maharashtra] महाराष्ट्र ही मराठी बोलीभाषा असणाऱ्या लोकांची भूमी आहे.
https://4.bp.blogspot.com/-d1FZWn900ak/XSCIL9X3jaI/AAAAAAAADjM/SPeGNDCU1F4juv2z6z4OqPtX4jFpctFyQCLcBGAs/s1600/paithan-near-godavari-river.jpg
https://4.bp.blogspot.com/-d1FZWn900ak/XSCIL9X3jaI/AAAAAAAADjM/SPeGNDCU1F4juv2z6z4OqPtX4jFpctFyQCLcBGAs/s72-c/paithan-near-godavari-river.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/vihangavlokan-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/vihangavlokan-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy