Loading ...
/* Dont copy */

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ (महाराष्ट्र) - सहकारी विकासाच्या बाबतीत भारतीय राज्यात महाराष्ट्र बहुतेक सर्वात अग्रेसर आहे.

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ (महाराष्ट्र)

सहकारी विकासाच्या बाबतीत भारतीय राज्यात महाराष्ट्र बहुतेक सर्वात अग्रेसर आहे


महाराष्ट्रातील सहकारी चळवळ (महाराष्ट्र)

सहकारी विकासाच्या बाबतीत भारतीय राज्यात महाराष्ट्र बहुतेक सर्वात अग्रेसर आहे. भारतीय सहकारी चळवळीमध्ये गुंतलेल्या खेळत्या भांडवलाचा १/६ भाग महाराष्ट्रातील सहकारी प्रयत्नात गुंतला आहे. खेळते भांडवल, ठेवी, स्वमालकीचा पैसा, भाग भांडवल, सभासदत्व व (सहकारी) संस्थाची संख्या या सर्वच, बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे.


(छायाचित्र: वाईचा साखर कारखाना)


१९६० मधे महाराष्ट्राचे एक भाषिक राज्य स्थापन झाल्यापासून सहकारी चळवळ वाढली आहे आणि तिच्यात विविधता आलेली आहे. १९८४ मध्ये महाराष्ट्रात कृषिसंबंधित अशा विविध उपक्रमांत गुंतलेल्या ७१,००० हून अधिक सहकारी संस्था होत्या. त्यांच्या उपक्रमांत वितरण, साखर उद्योग, भाताच्या गिरण्या, कृषिउत्पादनावर प्रक्रिया करण्याची केंद्रे, सूत-कताईच्या गिरण्या इत्यादींचा समावेशा होता. ग्राहकांना वस्तुपुरवठा आणि घरबांधणी अशा क्षेत्रांतही काम करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत. पण साखरेच्या कारखांन्याचा विकास हे राज्यातल्या सहकार चळवळीचे सर्वात लक्षणीय वैशिष्टय आहे.

महाराष्ट्रातील चळवळीच्या विस्तारपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा दर्जा. चळवळीमध्ये स्वायत्तता हा गुण विशेष प्रमाणात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतपेढी ही बलवान संस्था असून तिने प्रक्रियात्मक उद्योगाना (विशेषतः साखर उद्योगाना) प्रगती करण्यास प्रोत्साहन व प्रत्यक्ष मदत दिली आहे. १९८२ ते ८३ मध्ये ६१२ कोटी रुपयांच्या एकूण अंदाजपत्रकापैकी २६७ कोटी रुपये साखर कारखान्याना, १८२ कोटी रुपये तालुका पतपेढ्याना व ८८कोटी रुपये विक्री संस्थाना दिले आहेत.

पतपेढीच्या उद्योग आयोगाने या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या पतपेढीने उद्योगाच्या दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठीही मदत केली आहे. १९८० नंतरच्या दशकातील संभाव्य वित्तविकासाबद्दल श्री. धनंजयराव गाडगीळ यानी म्हटले आहे की ‘जिथे महत्वाची व्यापारी पिके काढली जातात अशा बऱ्याच विभागातील मोठ्या शेतकऱ्याच्या गरजा पीक कर्ज योजनेमुळे जवळजवळ पूर्णपणे भागविल्या जातील.

जमीन किंवा हवामानाची परिस्थिती यामुळे जे लहान शेतकरी कमी खर्चाची पिके घेतात त्यांचा पीक-कर्ज योजनेमुळे तितका फायदा होणार नाही.’ शेतकी वित्तपुरवठ्याच्या संकल्पनेत सहकारी संस्थाचा समाजातील दुर्बल घटकांचा अंतर्भाव करून या संकल्पनेचा विस्तार करण्याची पतपेढीने कोशीस केली आहे. परंतु या संदर्भात काही मर्यादांची तपासणी करणे आवश्यक आहे. खेडेगाव पातळीवरील प्राथमिक संस्थामध्ये तग धरण्यास असमर्थ व नुकसानीत चालणाऱ्या अनेक संस्थांचा समावेश आहे. परतफेडीला विलंब हा मोठा प्रश्न आहे. पतपेढ्यांचे दैनंदिन वित्तव्यवहार व विकासार्थ वित्तव्यवहार यांच्या मिलाफाविषयीचा सुस्पष्ट दृष्टीकोन अजून निर्माण व्हायचा आहे.

गेल्या काही वर्षात व्यापारी पतपेढ्यांच्या मानाने सहकारी पतपेढ्या मागे पडल्या आहेत. चळवळीतील दोष दूर करणे, खेडेगाव व जिल्हा पातळीवरील नियोजनाचा विकास करणे व सहकारी चळवळ अधिक जोमदार बनवणे यामध्ये यश मिळालेले नाही. कमी मुदतीचे अर्थव्यवहार व भूविकास अर्थव्यवहार यांची सांगड घालण्यात पुष्कळ करायचे राहून गेले आहे.

कालव्यांच्या पाटबंधाऱ्यांच्या सोयीत सहकारी प्रयत्नानी महाराष्ट्रात खूप सुधारणा झाली आहे. सहकारी पाळणा-पाटबंधारे संस्थांची संख्या १९६१ साली ११९ होती ती १९८४ साली १५९९ इतकी वाढली. त्यापैकी ४६० संस्थांना १९८४ साली नफा झाला तर ५६० संस्थांना तोटा आला. म्हणजेच या संस्थाच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होण्यास बराच वाव आहे. सहकारी संस्थामार्फत स्थानिक पाटकालवे बांधणे या क्षेत्रात अनेक उत्पादक गोष्टी करण्यासारख्या आहेत.

राज्यातील ग्राहक सहकारी संस्थाचे चित्र थोडे संमिश्र आहे. तरीही मुंबईतील मुंबई कामगार सहकारी ग्राहक संस्था हे उत्तम यशाचे उदाहरण आहे.

महाराष्ट्राला अनेक मध्यवर्ती सहकारी संस्था स्थापन झालेल्या असल्याचे श्रेय आहे. उदाहरणार्थ, पुण्यामध्ये राष्ट्रीय भारी अभियांत्रिकी सहकारी संस्था असून ती सहकारी साखर उद्योगाचे महत्त्वाचे अंग आहे. महाराष्ट्रात सहकार शिक्षणाचाहि चांगला विकास झाला आहे. राज्य सहकारी संघटनेने या बाबतीत कार्यक्षम भूमिका बजावली आहे.

देशातली सहकारी व्यवस्थापन शिक्षण देणारी सर्वोच्च संस्था - म्हणजे वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्था - ही पुण्यातच आहे. शिक्षणाकडे जास्त विशाल दृष्टिकोनातून पाहिले तर सहकारी संस्थानी अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य व कला या सर्व क्षेत्रातील शिक्षणाला हातभार लावला आहे. राज्यातल्या राजकीय संस्कृतीलाही सहकारी शिक्षणाचा महत्वाचा हातभार लावला आहे.

एक तर धंद्याच्या क्षेत्रात त्यामुळे आर्थिक सुधारणा होण्यास मदत झाली आहे. मागास, ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे उद्योगधंद्याचा अनुभव नसलेल्या जाती व वर्गातील, सर्व लोकाना उद्योजक होण्याची संधी मिळाली. शहरी भागांच्या मानाने ग्रामीण भाग बलवान झाले. (पश्चिम महाराष्ट्राखेरीज इतर भागांचा विकास करण्यात तितके यश मिळाले नाही.) त्याशिवाय सहकारी चळवळीमुळे लोकशाही वातावरणास मदत झाली. योजना खालपासून बांधीत नेणे हे सहकारी विकास झालेल्या जिल्ह्यात प्रकर्षाने दिसते.

आश्रयदातेपणाची वा शक्तीची केंद्रे ग्रामीण प्राथमिक सहकारी संस्थामध्ये नसली तरी तालुका पातळीवरील साखर कारखान्यासारखे प्रक्रिया करणारे उद्योग यांचा राजकीय विकास व आश्रय या बाबतीत बराच प्रभाव आहे. अनेक सहकारी साखर कारखाने या ना त्या राजकीय पक्षाशी किंवा शेतकरी संघटनेसारख्या न-राजकीय गटाशी निगडीत असतात.

१९४९ साली स्थापना झालेल्या प्रवरानगर सहकारी संस्थेने अशा अनेक संस्थांच्या मालिकेलाच चालना दिली. मागील पंचवीस वर्षात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या १४पासून ७५ पर्यंत वाढली आहे - म्हणजे पाचपट झाली आहे; आणि शिवाय १५ नवीन सहकारी साखर उद्योग स्थापन होण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यातल्या सहकारी साखर संस्थांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून साखर लागवडीखाली क्षेत्रही पाचपट झाले आहे. ऊसापासून साखर काढण्याचे प्रमाण, एकंदर साखर उत्पादन, दर हेक्टरमागे ऊसाचे उत्पादन, सदस्य शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांवर खर्च, राष्ट्रीय बचत योजनांमध्ये सहभाग, चांगल्या कार्यांना देणग्या अशा अनेक दृष्टींनी योजनांचा पुरस्कार करण्यात आणि भूगर्भातील पाणी गोळा करणारे तलाव, लहान बंधारे बांधण्यात वगैरे पुढाकार घेतलेला आहे.

आनुषंगिक उद्योग आणि तांत्रिक शिक्षण केंद्रे स्थापन करण्याच्या योजनाही त्यांनी हाती घेतलेल्या आहेत. साखर सहकारी संस्थांच्या जाळ्यांचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या बहुतेक अंगात दिसून येतो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला त्यांनी चालना दिलेली आहे.

सहकारी साखर संस्थांच्या प्रसरणाचा साहजिक परिणाम म्हणून ग्रामीण बहुजन समाजाला ऋतुयोग्य अशी मिळकतीची कामे उपलब्ध होतात. दर साखर कारखान्यामागे सरासरी ५००० माणसांना ऊस पिळण्याच्या मोसमात तात्पुरते काम मिळाते आणि दर कारखान्यांत हजार एक माणसे कायमच्या रोजगारावर असतात. आपल्या कार्यक्षेत्रात वसलेल्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यास अनेक साखर कारखाने हातभार लावतात. प्रत्यक्ष कारखांन्यात असलेल्या औषधपाण्याच्या सोयीखेरीज, अशा कारखान्यांमुळे आसपासच्या साधारण जनतेला प्राथमिक आरोग्यकेंद्रे, आरोग्यशिबिरे आणि तंत्रविज्ञानकेंद्रे उपलब्ध झाली आहेत. अशाच सामाजिक-प्रगती पर कार्यात शैक्षणिक सोयींचा प्रसारही अंतर्भूत होतो.

साखर संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे हल्लीच्या वर्षात नवीन शाळा. तंत्रविज्ञानकेंद्रे आणि अभियांत्रिकी महाविद्यालये उघडली गेली आहेत. सहकारी साखर संस्था या राज्यातील आर्थिक प्रगती आणि कल्याणकारी योजनांचा कारभार यांना महत्त्वाचे सहाय्य करीत आहेत.

सहकार हा राज्य अखत्यारीतील विषय आहे. सहकारी पतपेढ्या आणि राष्ट्रीय सहकार विकास आयोगासारख्या महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्थाना मदत देणाऱ्या संस्था यामधून केन्द्र सरकारचा प्रभाव जाणवतो. राज्य सरकारने ही स्वायत्त चळवळ वाढवण्यासाठी कोशीस केली आहे. अधिक परिणामकारक कर्जपुरवठा करणे व साधनसंपत्ती आकर्षून घेणे यासारख्या गोष्टी भावी काळात साध्य होतील अशी अपेक्षा आहे.

- एम. व्ही. नामजोशी


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,15,अनुरथ गोरे,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1199,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,3,अरुण कोलटकर,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,957,आईच्या कविता,22,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,24,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,48,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,66,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,62,कवी अनिल,1,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,2,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,3,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगुळकर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,11,गोड पदार्थ,56,गौतम जगताप,1,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,427,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,56,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,73,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,58,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,नमिता प्रशांत,1,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,9,निवडक,4,निसर्ग कविता,25,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,14,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,16,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,93,प्रेरणादायी कविता,16,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,3,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,9,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,3,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,16,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास धोत्रे,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,102,मराठी कविता,804,मराठी कवी,2,मराठी गझल,25,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,40,मराठी चित्रपट,15,मराठी टिव्ही,47,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,42,मराठी मालिका,18,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,44,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,71,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,308,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,6,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,17,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,10,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,6,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,22,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,56,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,6,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,11,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष महाशब्दे,9,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,31,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,10,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,132,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,19,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,317,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,40,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: महाराष्ट्रातील सहकारी चळवळ (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील सहकारी चळवळ (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील सहकारी चळवळ (महाराष्ट्र) - सहकारी विकासाच्या बाबतीत भारतीय राज्यात महाराष्ट्र बहुतेक सर्वात अग्रेसर आहे.
https://4.bp.blogspot.com/-abtYUjOEMPI/XSLH9qXiOuI/AAAAAAAADkE/3iTib63NY9wZvMgr_ks3VJzu6ikZZFWMACLcBGAs/s1600-rw/sugar-factory-wai.webp
https://4.bp.blogspot.com/-abtYUjOEMPI/XSLH9qXiOuI/AAAAAAAADkE/3iTib63NY9wZvMgr_ks3VJzu6ikZZFWMACLcBGAs/s72-c-rw/sugar-factory-wai.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/sahakari-chalval-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/sahakari-chalval-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची