Loading ...

एसएनडीटी महाविद्यालयात थॅलेसेमिया जनजागृती व तपासणी

पुणे येथील एसएनडीटी कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात थॅलेसेमिया जनजागृतीपर व्याख्यान व तपासणी शिबिर संपन्न.

एसएनडीटी महाविद्यालयात थॅलेसेमिया जनजागृती व तपासणी

एसएनडीटी कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात थॅलेसेमिया जनजागृतीपर व्याख्यान आणि विद्यार्थिनींच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…

एसएनडीटीत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची भेट

स्वाती खंदारे (मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार)

ठळक मुद्दे
  • एसएनडीटी कॉलेजचा रेड क्रॉस युथ विभाग व जनकल्याण रक्तकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
  • तज्ज्ञ वक्ता मानसी ठाकूर यांनी विद्यार्थिनींना थॅलेसेमियाचे स्वरूप, लक्षणे, कारणे व प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले.
  • व्याख्यानानंतर आयोजित शिबिरात एकूण ६० विद्यार्थिनींची थॅलेसेमिया तपासणी करण्यात आली.
  • प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे व डॉ. अंजली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

पुणे: एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय (स्वायत्त), पुणे येथील रेड क्रॉस युथ विभाग आणि जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबाबत जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शंभरहून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

जनकल्याण रक्तपेढीच्या मानसी ठाकूर यांनी थॅलेसेमियाचे स्वरूप, हा विकार एका पिढीकडून पुढील पिढीकडे कसा संक्रमित होतो, त्याची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. या विकाराबाबत योग्य माहिती मिळवणे आणि तपासणी करून घेणे यामुळे जागरूकता वाढण्यास मदत होते, हा संदेश विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविण्यात आला.

व्याख्यानानंतर महाविद्यालयाच्या वर्ग क्रमांक २१ मध्ये विद्यार्थिनींसाठी विशेष थॅलेसेमिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये एकूण ६० विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली.

हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे आणि उपप्राचार्या तथा विस्तार कक्ष प्रमुख डॉ. अंजली कदम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. रेड क्रॉस समन्वयक डॉ. प्रवीण गायकवाड आणि कु. कल्याणी साळुंखे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. जनकल्याण रक्तकेंद्राच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना आरोग्याविषयी मोलाची माहिती आणि तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची