Loading ...

बा दख्खना - मराठी कविता (सुदेश इंगळे)

बा दख्खना (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुदेश इंगळे यांची बा दख्खना ही मराठी कविता.

बा दख्खना - मराठी कविता (सुदेश इंगळे)

दख्खनच्या भूगोलात दडलेल्या इतिहास, संस्कृती आणि माणुसकीच्या व्यापक आत्म्याला अर्पण केलेली ही स्तुतीकविता आहे...

बा दख्खना

सुदेश इंगळे

कवी दख्खनला केवळ भौगोलिक प्रदेश मानत नाही, तर तो जीवनसंस्कृतीचा महाकाव्यात्मक अनुभव मानतो. भाषा, धर्म, परंपरा आणि इतिहास यांची मिसळ त्याच्या मातीत खोलवर रुतलेली आहे. संघर्ष, विज्ञाननिष्ठता आणि माणुसकीचा ठाम स्वभाव हा त्याचा वारसा आहे. देवत्व नाकारूनही सुपीक मातीसारखी सर्जनशील ऊर्जा दख्खन देत राहतो.

तू निव्वळ बेसाल्ट खडकाचा, चार राज्यांत, दोन घाटांत, तीन नद्यांत, चार पर्वतरांगांतला, निमुळता भौगोलिक प्रदेश थोडीच आहेस... तू आहेस कवटीभर जगण्याचं जंजाळ सूर्याच्या पार नेणारा, ‘बा दाव नाहीतर श्राद्ध घाल’ म्हणत श्वासागणिक वेद रचणारा महाकवी... "बक्कळ पाऊस पडू दे अन् जनावरं तेवढी जगू दे" इतकंच मागणं आभाळाला मागत खच्चून जगणाऱ्या काटकुळ्या आज्ज्याचा खडकाळ DNA पेरलेला माळ आहेस टेकाडावर बहमनी थाटाचं घुमटाकार भैरोबाचं देऊळ, रामसिद्धबुवा नावाच्या मुस्लिम पीराचं ग्रामदैवत अन् त्याची चैत्री जत्रा आहेस... जैन, बुद्ध, शैव, वैष्णव, शाक्त... एकमेकांत घट्ट रुतून कोरलेलं चंद्रडोही लेणं आहेस... शेकडो आडनावांच्या इरसाल खिचडीची भलीमोठी कढई आहेस... तुळु, मराठी, उर्दू, तेलगू, कन्नड अर्धा डझन खमक्या भाषा अन् कैक डझन बोलींचा आरस्पानी कशिदा आहेस बा दख्खना, तू महाकवी आहेस... भरदुपारी बकुळीवरून खारुताई निर्धास्त खाली येते, माणुसपणाच्या भरवशावर... तो गाढ, खोल, गोठीव भरवसा अन् आभाळाला ठिगळ लावत्या भरजरी जगण्याची विस्मयी ओढ... दोन्ही आहेस बा दख्खना, तू महाकवी आहेस जगाच्या अनोळखी वगनाट्यात पांढऱ्या पडलेल्या हैराण चेहऱ्यांचे जीव, स्वतःच्या अपराधबोधात तोंड लपवत वणवण करत उदास माणसं, दोन हजार वर्षांचा सामंती वेताळ खांद्यावर वागवत थकलेला समाज... जुनं सारं जाळून सहज आधाराच्या विटा रचत पंढरी उभारणारा पांडुरंग आहेस वडाची, जांभळाची जाणती झाडं, बारीकसारीक ओढे-ओहोळ, भुरी काळी उन्मादाची झळ पेलत, सोसत, जपत सारं पुनवेची प्रसन्नता घेऊन शेकोटीभोवती मांडलेला साज आहेस बा दख्खना, तू महाकवी आहेस निव्वळ भौगोलिक प्रदेश नाही, तू स्वाधीनतेची अवधारणा आहेस, माणुसकीच्या अपार तोऱ्यात गुंफलेली जात, धर्म, पंथ, लिंग—सटरफटर सारे भेद अलगद बाजूला करून आम्हाला सहज मुक्त करून उधाणलेलं जगायची स्फूर्ती आहेस पार आधीपासून, रानारानात, गावागावांत पुराण-पोथ्यांच्या होळ्या करून जगण्याचं ठक्क रोकड गणित मांडत विज्ञानाचा उदंड ध्यास आहेस इथं हरएक मेंदूत साकारणारी, येत्या सुदृढ जगाची कल्पना... निकोप, निरलस आयुष्याची स्वप्नं... ही रांगडी स्वप्नं पाहण्याची नजर देणारा निबार पूर्वज आहेस हद्द तोडणारी, ब्रह्मांड मापणारी खडकात बिया रोपून आभाळाला धडका देणारी आमच्या रक्तातली धग तूच आहेस... आणि महत्त्वाचं, ना कोणी देवता आहेस, ना पैगंबर, ना बुद्ध, ना ख्रिस्त, ना कोणी महापुरुष, ना महास्त्री... तू आहेस निव्वळ दगड फारफार तर तुझी माती होईल, तीही काळी अन् सुपीक... म्हणूनच, बा दख्खना, तू महाकवी आहेस

संपादकीय विश्लेषण

ही कविता दख्खनच्या भौगोलिक ओळखीपलीकडे जाऊन त्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी स्वरूपाचा व्यापक पट उलगडते. ‘बेसाल्ट खडक’ या प्रतिमेतून कठोरता आणि स्थैर्य सुचते, तर ‘महाकवी’ ही उपमा दख्खनच्या अनुभवसंपन्नतेचे रूपक ठरते. विविध धर्म, पंथ, भाषा आणि परंपरांचा संगम येथे संघर्ष न होता सहअस्तित्वात रूपांतरित झालेला दिसतो. सामंती वेताळ, अपराधबोध, सामाजिक जखमा यांचा उल्लेख वास्तवाची जाणीव करून देतो; परंतु त्याच वेळी नव्याने पंढरी उभारण्याची क्षमता दाखवतो. कविता देवत्व नाकारते, पण मातीच्या सुपीकतेतून सृजनाची शक्ती मान्य करते—यातून दख्खनचा मानवी, विज्ञाननिष्ठ आणि स्वाधीन स्वभाव अधोरेखित होतो.

सुदेश इंगळे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची